Bay- team aavaj marathi
मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)
युवा महाराष्ट्र फाउंडेशन व अखिल पुणे शहर नवरात्र महोत्सव समिती आयोजित नवदुर्गा नारिशक्ती सन्मान सोहळा २०२४व महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२४ टिव्ही सिनेमा अभिनेत्री,"सारें काही तुझ्या साठी"अक्षता उकिरडे, यांच्या शुभ हस्ते व डॉ. अविनाश संकुले व सरचिटणीस गणेश विटकर, व विविध संघटनेचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी मान्यवर उपस्थित लोक शाहिर अण्णाभाऊ साठे रंगमंदिर येरवडा पुणे येथे संपन्न झाला. पुणे येथील आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना व युवा महाराष्ट्र फाऊंडेशन आयोजित महाराष्ट्र गौरव उद्योजक २०२४हा राज्यस्तरीय पुरस्कार गंगाधरी त्या नांदगाव येथील ओमसाई स्नॅक्स अँन्ड गारवा जंक्शन"स्पेशल मिसळ"च्या संचालिका सौ. सुनिता भगीरथ जेजुरकर यांना त्यांच्या कार्यात मेहनत चिकाटी आणि जिद्दीने व्यवसाय करतात यांचे कौतुकास्पद कामगिरी बद्दल, महाराष्ट्र गौरव पुरस्कार देण्यात आला, त्या वेळी मान्यवरांनी महिला असून कमितकमी भांडवलात व्यवसाय सुरू करुन यशस्वी केल्या बद्दल त्यांना हा महाराष्ट्र गौरव पुरस्कार देण्यात आला.
त्यांना हा पुरस्कार मिळाला त्या बद्दल नांदगांव तालुक्यांचे लोकप्रिय आमदार , सुहास कांदे व सौ.अंजुमताई कांदे यांनी व नांदगांव तालुक्यातील विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच नांदगांव बाजार समितीचे सभापती सतिष बोरसे, पंचायत समिती चे माजी सभापती,सौ. सुमनताई विष्णू निकम, गंगाधरी येथील उद्योजक संदिप बागुल, सावता महाराज उत्सव समितीचे सदस्यांनी व पत्रकार बांधवांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
0 Comments