वाढदिवसाची भेट म्हणून शालेय उपयोगी आणाव्यात - मंत्री भुजबळ

 Bay -team aavaj marathi 

 मंगळवार दि.१५ ऑक्टोबर २०२४ रोजी राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री मा.ना.श्री.छगन भुजबळ यांचा ७७ वा वाढदिवस साजरा होत आहे. 

या निमित्ताने नाशिक येथील कार्यालयात  मा.मंत्री छगन भुजबळ हे सकाळी १० ते दुपारी १ वाजे पर्यंत शुभेच्छा स्वीकारणार आहेत. तरी यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शाल, बुके, हार व इतर वस्तू न आणता शुभेच्छा म्हणून केवळ वह्या किंवा पुस्तके शालेय उपयोगी वस्तू आणावेत जेने करून या वह्या गोरगरीब विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे.त्यामुळे शाल,बुके, हार न आणता वह्या किंवा पुस्तके आणाव्यात अशी सूचना मा.ना. श्री.छगन भुजबळ यांनी केली आहे. मंत्री भुजबळ यांचे जनसंपर्क विभाग कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments