आ. कांदे यांच्या प्रयत्नातून पोखरा योजनेत तालुक्यातील ३१ गावांचा समावेश

 Bay- team aavaj marathi 

भरत पाटील पत्रकार, जातेगाव नांदगाव (नाशिक)

   दि. १० ऑक्टोबर रोजीच्या शासन आदेशानुसार नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोखरा योजनेची मुदत संपल्याने हा प्रकल्प बंद करण्यात आला होता. परंतु शेतकरी समृद्ध करण्यासाठी पोखरा योजना खूप फायद्याची व महत्त्वाची असल्याने शिंदे सरकारने या योजनेचा सूक्ष्म अभ्यास याही पुढे पोखरा योजना सुरू ठेवण्याचे धोरण आखल्या पासून तालुक्याचे कर्तव्यदक्ष आ.सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून तालुक्यातील जास्तीत जास्त गावे समाविष्ट करण्यात आले.

 यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा टप्पा दोन मध्ये तालुक्यातील १)श्रीराम नगर २)फुलेनगर ३)गिरणा नगर ४)क्रांतीनगर ५)मल्हारवाडी ६)गंगाधरी ७)दहेगाव ८)आझाद नगर ९)मांडवड १०)मोहेगाव ११)लक्ष्मी नगर १२) मोरझर १३) वडाळी खुर्द १४) वडाळी बुद्रुक १५)सोयगाव १६) बोराळे १७) अमोदे १८) मंगळणे १९) बेहेळगाव २०) पळाशी २१)साकोरे २२)न्यू पांझण २३) पोही २४)लोढरे २५) वसंनगर २६)जातेगाव २७)गोंडेगाव २८)जवळकी २९) बोलठाण ३०) रोहिले बुद्रुक ३१ गावांचा समावेश करण्यात आला.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी पोखरा प्रकल्पातून शेतकऱ्यांना विविध योजनेचा लाभ घेता येणार असल्याने शेतकरी समृद्ध व स्वयंपूर्ण होण्यास मदत होणार आहे या योजनेतून शेतकऱ्यांना ठिबक संच ,बीज उत्पादन, सूक्ष्म सिंचन ,फलोत्पादन, शेडनेट, पॉलिहाऊस ,नर्सरी ,शीतगृह अशा विविध योजनांचा लाभ घेता येणार आहे वरील सर्व योजनेचा लाभ मिळणार असल्याने सर्व शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.


 



 नानाजी देशमुख कृषी संजीवनी पोखरा प्रकल्पात नांदगाव तालुक्यातील ३० गावांचा समावेश झाला असून पुढील काळात संपूर्ण नांदगाव तालुकाच या पोखरा प्रकल्पात समाविष्ट असेल 

           --  आमदार श्री सुहास कांदे 


[ माननीय आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या विशेष प्रयत्नातून घाटमाथ्यावरील शेतकऱ्यांना नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी पोखरा प्रकल्पात समावेश करून शेतकऱ्यांना न्याय दिला निश्चितच सदर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना व सामान्य जनतेचा फायदा होईल. आमच्या या विशेष मागणीला अण्णा साहेबांनी पूर्ण केल्याबद्दल आमदार साहेबांचे घाटमातेवरील जनतेच्या वतीने जाहीर आभार 

 श्री गुलाब रावसाहेब चव्हाण या युवा सेना नांदगाव तालुका प्रमुख ]

Post a Comment

0 Comments