पोखरी ता.नांदगांव येथील रहिवाशी असलेली कल्याणी अशोक दिवे वय २१ वर्षे हि तरुणी दि १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वा. कुटुंबात कुणाला काही एक न सांगता घरतुन निघून गेली या बाबत ची खबर विशाल अशोक दिवे यांनी रा.पोखरी ता. नांदगांव यांनी नांदगांव पोलिसात दिली आहे सदर तरुणी चे वर्णन या प्रमाणे केस काळे व लांब, नाक सरळ, मध्यमबांधा, उंची ५ फुट ३ इंच, डोळे काळे,अंगावर हिरव्यरंगाचा पंजाबी ड्रेस,पायात राखाडी चप्पल,शिक्षण १० वी.भाषा मराठी बोलते या वर्णनाची तरुणी बेपत्ता झाली असून तिचा शोध घेताला जात आहे. कुटुंबातील व्यक्तीनी सर्वञ शोध घेतला पण मिळून न आल्याने पोलिसात खबर देण्यात आली आहे. घटनेचा शोध पो नि प्रितम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सा.पो नि बढे,पो ह धर्मराज अलगट हे करीत आहे.
0 Comments