नांदगाव तालुक्यात एक नाही दोन महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये लिंगपिसाटांवर गुन्हे दाखल

 Bay -team aavaj marathi 

नांदगाव तालुक्यात एक नाही दोन महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये लिंगपिसाटांवर दोन दिवसांत गुन्हे दाखल झाले आहे. त्यामुळे तालुक्यात ठिकठिकाणी चर्चा सुरू असून अशा लिंगपिसाटांवर पोलीस बांधवांनी कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा नागरिक करत आहेत. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील एकाने नराधमाने दिर भावजाई च्या नात्याला कलंक लावला तर एकाने अल्पवयीन वर्षे १२ वयाच्या मुलिशी संबंध प्रस्थापित करुन गरोदर केले.अशा दोन विभिन्न प्रकारच्या घटना घडल्या आहेत. या दोघांच्या विरोधात नांदगाव पोलिस ठाण्यात फिर्यादी दाखल करण्यात आल्या असून, एका घटनेतील आरोपी विशाल अनिल पवार यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ४४०/२०२४ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ - चे कलम ६४ (१)(२),(F)(M), ६९, ३५१,(२)(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेतील आरोपी विशाल अनिल पवार (वय २४) यास अटक न्यायालयात हजर केले असता, त्यास एक दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. त्याची आज नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. 

तर दुसर्या घटनेतील आरोपी मच्छिंद्र हरिदास माळी याच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ४४२/२०२४नुसार भारतीय न्याय संहिता ४४०,४४२,३७६, (२)(i)(f) प्रमाणे व पोसको अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप आरोपीस अटक करण्यात आली नसल्याचे समजते. वरील दोन्ही घटनेंचे गांभीर्य लक्षात घेऊन मनमाड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांनी तातडीने नांदगाव पोलिस ठाण्यात भेट देऊन गंभीर स्वरूपात गुन्हे दाखल करणेबाबत सुचना केल्या त्या नुसार पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली वरील दोन्ही घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडे आणि पोलिस उपनिरीक्षक संतोष बहाकर हे करत आहेत.


Post a Comment

0 Comments