Bay- team aavaj marathi
विजय जी चोपडा जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)
नांदगाव येथील जे.टी.कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल व सौ.क.मा. कासलीवाल प्राथमीक/ माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नांदगाव नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्री.सागरभाऊ हिरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.मुख्याध्यापक विशाल सावंत यांनी प्रमुख अतिथी नगराध्यक्ष सागर भाऊ हिरे यांचा परिचय करून दिला.
याप्रसंगी नगराध्यक्ष सागर भाऊ हिरे यांचा संस्थेच्या वतीने चेअरमन मा.श्री.सुनीलकुमार कासलीवाल यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच सेक्रेटरी मा.श्री. विजयजी चोपडा यांनी श्री.अमोल नावंदर यांचा तर शिवसेना गटनेत्या स्वातीताई नावंदर यांचा सत्कार संस्थेच्या सहसचिव प्रमिला ताई कासलीवाल यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते ,तसेच समूहनृत्य सादर केले. अमायरा कासलीवाल हिने मनमोहक नृत्य सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. पुष्कर मेहर,उद्धव दिवे,अनशरा शेख,भावना गुढेकर या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे देशभक्तीपर मनोगत व्यक्त केले.
यानंतर बक्षीस वितरण समारंभात 'रंगोत्सव सेलिब्रेशन मुंबई' या संस्थेच्या वतीने संस्थेचे चेअरमन सुनीलकुमार कासलीवाल यांना 'द ट्रान्सफॉरमॅटिव्ह काँट्रीब्युशन अवॉर्ड' देण्यात आला. कासलीवाल विद्यालयातील 'रंगोत्सव ' व' 'रंगभरण ' या स्पर्धेमध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये हृदय अग्रवाल,विया फोफलिया,अर्ना सुराणा,अनुष्का दाभाडे,सागर आव्हाड,चैतन्य कटारे,सायली पेंढारकर,लावण्या जगधने यांना पारितोषिक देण्यात आले.तसेच तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम आलेल्या अथर्व काळे व युग खैरनार या विद्यार्थ्यांना देखील गौरविण्यात आले.त्याचप्रमाणे विभागीय शुटिंग बॉल स्पर्धेत कासलीवाल माध्यमिक विद्यालयाने उपविजेतेपद मिळविलेल्या संघाला सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खुशाली शिंदे या विद्यार्थिनीस सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी नगराध्यक्ष सागर भाऊ हिरे, संस्थेचे चेअरमन सुनीलकुमार कासलीवाल, सेक्रेटरी विजय चोपडा,रिखबचंद कासलीवाल ,जुगलकिशोर अग्रवाल, महेंद्र चांदिवाल, सुशीलकुमार कासलीवाल ,आनंद कासलीवाल , प्रमिला ताई कासलीवाल,प्रशासन अधिकारी गुप्ता सर,शिवसेना गटनेत्या स्वातीताई नावंदर,अमोल नावंदर, श्रीमती निर्मला काकी जी कासलीवाल,अंकुर कासलीवाल,मयुरी कासलीवाल,कुणाल कासलीवाल, प्रिन्सिपॉल मनी चावला,मुख्याध्यापक गोरख डफाळ, विशाल सावंत,तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेंद्र दामले व चांदणी पारख यांनी तर शरद पवार यांनी आभार व्यक्त केले.



0 Comments