सावत्र बापानेच केला मुलीवर पाच महिने अत्याचार पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Bay- team aavaj marathi 

नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे एका अल्पवयीन १२ वर्षाच्या मुलीवर सावत्र बापानेच केला मुलीवर आज महिने अत्याचार केल्या- प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल दाखल करण्यात आला असून माणुसकीला काळिमा असणाऱ्या या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. 

या बाबत सविस्तर वृत्त असे की, येथील बोरसे वस्ती येथील लक्ष्मन रघुनाथ बोरसे या नराधमाने आपल्या बारा वर्ष सहा महिन्याच्या सावत्र मुलीवर एप्रिल ते आक्टोबर २०२५ या कालावधीत आपल्या रहात्या घरात आणि बाजूलाच असलेल्या जंगलात नेऊन जबरदस्तीने अत्याचार केल्याप्रकरणी दि.१४ मार्च २०२६ रोजी नांदगाव पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १०४/२००६ पोक्सो अंतर्गत ४ व ६ प्रमाणे आणि बि एन एस कलम ६४(२) (एफ)(एम) , ६५(१)(२), ३५१(२)(३) गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेतील आरोपी लक्ष्मन रघुनाथ बोरसे यास ताब्यात घेण्यात आले आहे.  

माणुसकीला काळिमा असणाऱ्या या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून अल्पवयीन मुलीबद्दल संवेदना व्यक्त होत असून, वडील आणि मुलगी यांच्यातल्या पवित्र नात्याला डाग लावणार्या यातील आरोपी चा सर्वत्र निषेध व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच मनमाड चे उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन, पोलिस निरीक्षक दिगंबर भदाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे यांनी घटनास्थळी भेट देवून पाहाणी केली. वरील घडलेल्या घटनेची पोलिस अधीक्षक नाशिक ग्रामीण, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव यांना माहिती देण्यात आली असून वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिगंबर भदाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे, पोलिस हवालदार भास्कर बस्ते, पो. शिपाई परमेश्वर श्रीखंडे हे अधिक तपास करत आहेत. 

Post a Comment

0 Comments