स्टुडंट्स वेलफेअर इंग्लिश मेडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे कराटे स्पर्धेत सुवर्ण यश

 Bay- team aavaj marathi 

Dr. शिवचरण हिंगमिरे पत्रकार उमरखेड (यवतमाळ)

वाशिम जिल्हा कराटे असोसिएशन व मेरा युवा भारत वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ७ व्या माँ साहेब जिजाऊ चषक खुल्या राज्य स्तरीय कराटे स्पर्धेत उमरखेड येथील स्टुडंट्स वेलफेअर इंग्लिश मिडीयम स्कूल, दहागाव येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

 या स्पर्धेत स्टुडंट्स वेलफेअर इंग्लिश मेडीयम स्कुल दहागाव शाळेतील समृद्धी संजय गोटे, श्रीनय शशिकांत आखरे, गौरी शशिकांत आखरे व ईश्वरी अविनाश जाधव या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत तिन सुवर्ण पदकावर व एका रजत पदकावर आपले नाव कोरले. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेचे नाव जिल्हास्तरावर उज्वल झाले आहे.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष दर्शन अग्रवाल, उपाध्यक्ष एन. आर. वड्डे, सचिव नितीन भुतडा, सपना अग्रवाल व्यवस्थापक आशिष लासिनकर मुख्याध्यापक एम.पी.कदम, मुख्याध्यापिका पल्लवी पराते, शिक्षकवृंद, पालकवर्ग व कराटे प्रशिक्षक विलास भोसले यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments