उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यात दोन बायका केलेल्या एका व्यक्तीला मोठी डोकेदुखी झाली, दररोजच्या भांडण तंटा अखेर हा वाद गाव पंचांकडे गेला. पंच मंडळींनी एकत्र बसली आणि कोणावरही अन्याय होणार नाही, असा निर्णय जाहीर केला. निर्णय देताना पंच मंडळींनी पतीने सोमवार ते बुधवार पहिल्या पत्नीसोबत, तर गुरुवार ते शनिवार दुसऱ्या पत्नीसोबत राहील असा -३-१ चा फॉर्म्युला सध्या चर्चेचा विषय झाला आणि वाद संपुष्टात आला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, वरील घटना उत्तर प्रदेशच्या रामपूर जिल्ह्यात घडली आहे. दोन बायका आणि त्यांचा पती यांच्यात सातत्यानं होत असलेले वाद शेजाऱ्यांसाठी तापदायक ठरत होते. अखेर भांडण मिटवण्यासाठी ग्राम पंचायतीची बैठक बसली. दोन्ही पत्नी आणि त्याचा पती बैठकीला उपस्थित होते. बैठकीला अख्खा गाव जमला होता. संपूर्ण गावाच्या उपस्थितीत या प्रकरणावर तोडगा निघाला. याची चर्चा सध्या पंचक्रोशीत आहे.
घटना अजीम नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या आकिल गावात घडली आहे. इथे राहणाऱ्या एका व्यक्तीनं दोन विवाह केले आहेत. लग्न करणारी व्यक्ती मुस्लिम समाजातील आहे. पहिलं लग्न अरेंज आणि दुसरं लव्ह, असा विषय आहे. दोन्ही पत्नी पतीवर पूर्ण हक्क सांगायच्या. तो आपल्या सोबतच राहावा, असा त्यांचा हट्ट होता. यावरुन दररोज वाद व्हायचे. प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेलं.
विषय पोलिसांच्या हाताबाहेर जाताच ग्राम पंचायतीची बैठक बोलावण्यात आली. पंचांनी दोन्ही पत्नी आणि पतीची बाजू ऐकून घेतली. यानंतर एक लिखित करार करण्यात आला. त्यानुसार सोमवार ते बुधवार पती त्याच्या पहिल्या पत्नीसोबत वेळ घालवेल. तर गुरुवार ते शनिवार तो दुसऱ्या पत्नीसोबत राहील. रविवारचा वेळ मोकळा असेल. तो दिवस पतीसाठी असेल. त्या दिवशी तो एकांतात राहील आणि हवं तिथे जाण्यास स्वतंत्र असेल.
यासोबतच पंचायतीने आणखी एक गोष्ट स्पष्ट करताना म्हटले की, एकमेकांच्या सहमतीने एखादा दिवस पुढे मागे केला जाऊ शकतो. भविष्यात तिघांमध्ये कोणताही वाद होऊ नये यासाठी लिखित करार करण्यात आला. त्यावर तिघांच्या स्वाक्षरी घेण्यात आल्या. दोन पत्नी आणि पती यांच्यातील वाद आणि त्यावर तोडगा म्हणून काढण्यात आलेला ३-३-१ चा फॉर्म्युला सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
दोन पत्नी मध्ये पतीची विभागणी झाल्याची ही पहिलीच घटना नाही. याआधी बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातही असाच प्रकार घडला होता. पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता एका व्यक्तीनं दुसरं लग्न केलं. विषय पोलिसांपर्यंत गेला. यानंतर अटकेच्या भितीनं दोन पत्नी एकत्र बसल्या व त्यांनी आपसात पतीची वाटणी करून. त्यांनीही ३-३-१ असा तोडगा काढत वाद मिटवून घेलता होता.
0 Comments