पुसद येथील सौ. सविता शालिकराम गडवे ह्या शेगांव उमरखेड बसमध्ये पुसद ते पोफाळी प्रवास करीत असतांना प्रवास दरम्यान अज्ञात चोरट्याने १५ ग्रॅम वजनाची गहु मण्याची दोन लाख,दहा हजाराची सोण्याची पोत चोरीला गेली असल्याची तक्रार दाखल करताच पोलिसांनी घटनेचे चे गांभीर्य ओळखून तात्काळ कारवाई करत दोन संशयित महिलांना ताब्यात घेऊन दोन लाख दहा हजार रुपयाचा ऐवज जप्त केला.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक २६ फेब्रु.रोजी उमरखेड तालुक्यातील पोफाळी पोलीस स्टेशन मध्ये पुसद सौ. सविता शालिकराम गडवे रा.सुभाषनगर यांनी पोफळी पोलिसांना दिलेल्या तक्रारी नुसार, त्या शेगांव उमरखेड बसमध्ये पुसद ते पोफाळी प्रवास करत असतांना प्रवास दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने आपली १५ ग्रॅम वजनाची गहु मण्याची दोन लाख दहा हजार रुपयाची सोण्याची पोत चोरुन नेल्याची माहिती पोलिसांना दिली.
या घटनेचे गांभीर्य ओळखुन पोलीस स्टेशन पोफाळी चे पथक आणि वाहतूक शाखा उमरखेड च्या पथकाने ॲक्शन मोडमध्ये येवून तात्काळ बसचा सिनेस्टाईल पाठलाग करुन बस उमरखेड जवळील बेलखेड फाट्यावर थांबवून महीला पोलीस अंमलदार कडून बस मध्ये प्रवास करीत असलेल्या महीलांची सूक्ष्म तपासणी घेत असताना बस मधील दोन महीला वर संशय आल्याने सदर महीलांची अंगझडती घेतली असता त्यापैकी एका महीले जवळ फिर्यादीने दिलेल्या तक्रारी नुसार चोरीस गेलेली १५ ग्रॅम वजनाची दोन लाख दहा हजार रुपयाची गहु मण्याची सोण्याची पोत मिळाली. दोन्ही महीलांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने दोन्ही त्यांना पोफळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.अवघ्या दोन तासांच्या आत चोरीचा तपास पूर्ण केल्याने पोफळी पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे.
पुढील कारवाई पोलीस अधिक्षक कुमार चिंता,अप्पर पोलीस अधिक्षक अशोक थोरात, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड मार्गदर्शनाखाली, पोफाळी ठाणेदार निलेश शेंबडे,प्रभारी वाहतुक उपशाखेचे सहाय्यक पो.नि. अमोल गुंडे, पो.उप. नी. सुरेश शिंदे, शिवाजी पवार, हिम्मत बंडगर,पवन चंदेवाड, शिवाजी चंद्रवंशी, सिमा इंगळे, निलम श्रीवास, फिरोज काझी, नागेश वास्टर यांनी पार पाडली. पुढील तपास शिवाजी पवार करीत आहेत.
0 Comments