पोलीस चौकीच्या प्रांगणात हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून कायद्याचे मार्गदर्शन

  Bay- team aavaj marathi 

 दि २६.... 

नांदगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बोलठाण येथील पोलीस औट पोस्टच्या प्रांगणात रविवार दि.२५ रोजी सायंकाळी पाच वाजता पोलिस निरीक्षक दिगंबर भदाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलिस हवालदार भास्कर बस्ते आणि पोलीस नाईक परमेश्वर श्रीखंडे यांच्या पुढाकाराने महिलांसाठी संक्रांती चे निमित्ताने हळदी कुंकू चा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भदाणे यांनी महिला सुरक्षेसाठी असलेल्या विविध कायद्या विषयी माहिती देवून मार्गदर्शन केले

या कार्यक्रमासाठी पो नि. दिगंबर भदाणे यांच्या पत्नी सौ. रंजना भदाणे, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.आमरीन शेख, पो. हवा.बस्ते यांच्या पत्नी सौ. मंजूषा बस्ते, पो.कॉ श्रीखंडे यांच्या पत्नी अश्विनी श्रीखंडे, उपसरपंच अंजुम ताई पठाण यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रा.आ.केंद्राच्या परिचारिका प्रज्ञा शिनगारे,

 व इतर महिला कर्मचारी, स्थानिक माध्यमिक व प्राथमिक शाळेच्या शिक्षिका, आशा कर्मचारी, बॅंक व पत संस्थेच्या महिला कर्मचारी, अंगणवाडी सेविका, महिला पोलिस सखी यांच्यासह गावातील महिला सामाजिक व राजकीय क्षेत्रातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी आकर्षक मंडप उभारण्यात आला होता.

याप्रसंगी येथील सरपंच वाल्मीक गायकवाड, राजेंद्र नहार, रफीक पठाण,बाळासाहेब चव्हाण, जितेंद्र पाटणी, भानुदास घुले, दिपक घुले, गोकुळ कोठारी हे उपस्थितीत होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी येथील पो.कॉ दिपक पगार पो.कॉ दत्तात्रय सोनवणे पोलीस मित्र निसार पिंजारी रफीक बेग आरीफ पिंजारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments