नांदगाव विधानसभा मतदार संघात ९५७४ नवमतदार ठरवतील उमेदवाराचे भवितव्य

 Bay- team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

नांदगाव विधानसभा मतदार संघात होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीत नव्याने पहिल्यांदा मतदान करणारे नवमतदार ९५७४ ठरवतील उमेदवाराचे भवितव्य यात प्रामुख्याने महायुतीचे विद्यमान आ. सुहास कांदे महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश धात्रक यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. या व्यतिरिक्त अपक्ष डॉ.रोहन बोरसे, मा. खासदार समीर भुजबळ आणि पत्रकार भगवान सोनवणे हे विधानसभा निवडणुकीत संभाव्य उमेदवार असतील अशी तालुक्यात चर्चा सुरू आहे.

सन २०१९ च्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत नांदगाव विधानसभा मतदारसंघात क्रमांक ११३ मध्ये ५९.८९ % मतदान झाले होते. त्याअनुषंगाने होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदार संघात ९५७४ नवमतदार व १५ मतदान केंद्र वाढले आहेत. त्याअनुषंगाने या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे. यासाठी प्रशासना कडुन जोरदार प्रचार मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी प्रशासनाने अवश्यकती तयारी केली असून मतदारसंघात ३४१ मतदान केंद्रामध्ये तीन लाख ४० हजार ३७८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात १ लाख ७७ हजार चारशे सहव्वीस पुरुष मतदार आहेत. तर १ लाख ६२ हजार नऊशे अठ्ठेचाळीस स्री मतदार व इतर ४ मतदार आहेत. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी संपूर्ण नियोजन झाले आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सुरेखा चव्हाण व तहसीलदार सुनील सौंदाणे यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली. 

८५ वर्ष वरील जेष्ठ ६३९९ मतदारांची संख्या या मतदारसंघात आहे. तर दिव्यांग १४९१ मतदार आहेत. मतदानाच्या दिवशी दिव्यांग मतदारांसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर त्यांच्या मदती करिता स्वयंसेवक नेमले जाणार आहेत. या मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचविणे त्यासाठी वाहनाची व्यवस्था व व्हीलचेअर ची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी दिव्यांग मतदारांनी निवडणूक आयोगाच्या सक्षम ॲपवर नोंदणी करणे आवश्यक आहे.

तसेच वयवर्ष ८५ पेक्षा जास्त वय असणाऱ्या मतदारांसाठी पोस्टल बॅलेट द्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. त्यासाठी मतदारांनी फार्म 12 D घरोघरी पोहोचले जातील.या मतदारांना पोस्टल बॅलेट द्वारे मतदान करता येईल परंतु ही सुविधा वैकल्पिक आहे. नांदगाव विधानसभा मतदारसंघात तीन महिला संचलित मतदान केंद्र असणार आहे. एक आदर्श मतदान केंद्र, एक दिव्यांग अधिकारी PWD द्वारे संचलित मतदान केंद्र व एक युवा संचलित मतदान केंद्र निर्माण केले जाणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सुरेखा चव्हाण यांनी दिली. 

ही निवडणुक प्रक्रिया पार पाडण्यासाठी १९२३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असुन निवडणूकीची मुख्य धुरा या कर्मचारी वर्गाच्या खांद्यावर आहे. नांदगाव विधानसभा मतदारसंघातील एकूण मतदान केंद्रापैकी पन्नास टक्के मतदान केंद्रावर वेबकाॅस्टींग आणि होणार आहे. आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी साठी मतदार संघात फिरती पथके, स्थिर सर्वेक्षण पथके, व्हीडिओ सर्वेक्षण पथके, निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली कार्यरत असणार आहे. तसेच मतदान केंद्राच्या संख्येनुसार ३६ सेक्टर अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व मतदान केंद्रावर मतदारांसाठी पिण्याचे पाणी, शौचालय, वाहनतळ, पार्किंग, व्हीलचेअर, इ. व्यवस्था असणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली आहे. 




Post a Comment

0 Comments