Bay -team aavaj marathi
नांदगाव तालुक्यातील चंदणपूरी येथे तलाठी कार्यालयाचे सुरू असलेले बांधकामाच्या पुढिल आणि पाठीमागील दोन्ही बाजूचे साधारण आठ फूट उंच विट बांधकाम शुक्रवार दिनांक १८ रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान कोसळले. यावेळी येथे आठ- दहा लहान मुलं खेळत होती, त्यापैकी विद्या दिलीप डांगे ८ वर्ष वयाची मुलगी जखमी झाली, दैव बलवत्तर म्हणून वाचली.
जखमी झालेली मुलगी व तिचे पालक आणि इमारतीचे पुढील बाजूचे कोसळलेले विट बांधकाम

सविस्तर वृत्त असे की, चंदणपूरी वसंत नगर एक व दोन आणि लोढरे या महसूली गावांसाठी सन २०१७ मध्ये स्वतंत्र तलाठी सजा मंजूर झाल्यानंतर तलाठी कार्यालयाची मागणी करण्यात आली त्या मागणी नुसार चंदणपूरी येथे मुख्यालय मंजूर करण्यात आल्याने येथे जुन्या अंगणवाडी च्या ठिकाणी तलाठी कार्यालयाच्या नविन इमारतचे बांधकामास कार्यारंभ आदेश जानेवारी २०२४ मध्ये भैरवनाथ इंजिनिअर या एजन्सी ला तालुक्यात १२ ठिकाणी तलाठी कार्यालयाच्या नविन इमारतचे बांधकामांचे टेंडर देण्यात आले होते. या सर्व बांधकामांना महसूल विभागाच्या गौण खनिज विभागातून २०२३/२४ च्या अर्थ संकल्पामध्ये जुलै महिन्यात प्रती एका ५×५ मिटरच्या बांधकामासाठी १५ लक्ष रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. या बांधकामाची प्रत्यक्षात सुरुवात फेब्रुवारी २०२४ मध्ये करण्यात आली.
बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची पाठीमागील कोसळलेली भिंत

0 Comments