Bay- team aavaj marathi
गेल्या 40 वर्षांपासून मतदार संघातील धनगर बांधवांच स्वप्न आज पूर्ण झालं, आमदार सुहास आण्णा कांदे यांनी राजीनामा अहिल्यादेवींचा पूर्णाकृती पुतळा व अतिशय सुंदर असे स्मारकाचे काम पूर्ण करत दिलेला शब्द पाळला, शुक्रवार दि. २ रोजी स्मारकाचे लोकार्पण केले. याप्रसंगी यावेळी यळकोट यळकोट जय मल्हार,हर हर महादेव च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
या कार्यक्रमाचे क्षणचित्रे बघण्यासाठी खालील लिंक ला टच करा
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून होळकर वंशज मुकुंद राजे होळकर यांच्या सुविद्य पत्नी सुलोचना होळकर उपस्थित होते.
यावेळी आ. कांदे यांचा धनगर समाजाच्या वतीने काठी आणि घोंगडी देवून सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून अहिल्यादेवी चौक नांदगाव येथे होळकरांच्या राज्यातील होळकर शाहीतील होळकर राज्य चिन्ह मुद्रा बसविण्यात आली. तसेच नांदगाव शहरातील छत्रपती संभाजीनगर रोड वरील हमालवाडा भागाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असे नामकरण करण्यात आले. याप्रसंगी तालुक्यातील हजारो धनगर बंधू-भगिनी बांधव तसेच नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
0 Comments