परतीच्या पावसाने नांदगाव तालुक्यातील या भागातील धरण ओव्हरफ्लो

 Bay- team aavaj marathi 

सिताराम पिंगळे सर पत्रकार मांडवड, नांदगाव (नाशिक) 

नांदगाव तालुक्यातील लक्ष्मीनगर- मांडवड येथील शाकांबरी नदीवर असलेले धरण आज भरून ओव्हरफ्लो झाले आहे. धरण भरल्याने पंचक्रोशी -तील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या हंगामातील पावसाळा सुरू होऊन तो आता संपत आला आहे.परंतू यंदा पावसाने तालुक्यात जेमतेम पाऊस पडला खरीप हंगामात पावसाच्या अधुन मधुन येणार्या सरींवर पिके कमी अधिक प्रमाणात येतील पण रब्बी हंगामातील पिके आणि पिण्या- च्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता होती.

तालुक्यातील शेतकरी राजासह नागरिकांना पावसाची ओढ होती परंतु परतीच्या पावसाने बर्याच ठिकाणी नदीनाले दुथडी भरून वाहू लागले तर लहान मोठे पाझरतलाव भरून सांगाव्यातुन पाणी बाहेर पडल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

मागील काही दिवसापूर्वी लोहशिगवे धरण शेत्रात परतीच्या पावसाने हजेरी लावली आणि लोहशिगवे धरण भरले.तेथील पाणी लक्ष्मीनगर मांडवड धरणात पोहचे आणि अनेक दिवसांची प्रतीक्षा संपली लक्ष्मीनगर चे धरण १००%भरले पण शाकंभरी नदीला पाणी आजुन नाही. त्यासाठी मोठ्या पावसाची शेतकरी राजा वाट बघत आहे. या नदीवर तालुक्यातील अनेक गावे येतात आणि तेथील शेतकऱ्यांना याचा फायदा होतो परंतु खरीप हंगाम आता संपला असून रब्बीची अशा लागून राहिली असली तरी तालुक्यात आजुन ही समाधानकारक पाऊस झाला नाही ज्याने नदी व नाले कोरडे आहे पण समाधानकारक पाऊस झाला तर नदी व नाले खळखळून वाहतील व रब्बी हंगाम समाधान कारक होईल.

Post a Comment

0 Comments