आ सुहास अण्णा कांदे यांनी मानले प्रशासनासह नागरिकांचे आभार

 Bay- team aavaj marathi 

काल शिव महापुराण कथेचा समारोप झाला, आणि या सात दिवसांच्या प्रवासात आपण सर्वांनी पंडित प्रदीप जी मिश्रा यांच्या पवित्र वाणीतून शिव महापुराण कथेचे श्रवण केले. या आयोजनाच्या यशस्वीतेमध्ये तुम्हा सर्वांचा मोठा वाटा आहे, आणि त्यासाठी मी आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो.असे आ सुहास अण्णा कांदे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, सर्वप्रथम, आपल्या कथेचे यश हे रात्रंदिवस अविरत सेवा देणाऱ्या स्वयंसेवकांच्या परिश्रमामुळे शक्य झाले आहे. पार्किंग व्यवस्थेपासून, जेवणाच्या किचनपर्यंत, आणि भोजन व्यवस्थापनापर्यंत आपले कार्य कौतुकास्पद होते. अगदी शिस्तबद्धपणे सर्व गोष्टींचा प्रबंध करत, आपण आपले कर्तव्य अगदी जबाबदारीने पार पाडले.

त्याचप्रमाणे, या महत्त्वपूर्ण काळात हॉस्पिटलमधील शासकीय डॉक्टरांनी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी भाविकांच्या आरोग्याची काळजी घेतली. आपल्यामुळे भाविकांना आवश्यक ते उपचार मिळाले, ज्यामुळे कोणतीही अडचण न होता कार्यक्रम सुरळीत पार पडला.

पोलीस यंत्रणेसाठी विशेष आभार! आपल्या सतर्कतेमुळे आणि सुरक्षा व्यवस्थेमुळे शिवभक्तांना कोणत्याही प्रकारची अडचण न येता त्यांनी भक्तीमय वातावरणात कथा अनुभवली. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा प्रशासनाने केलेल्या योग्य व्यवस्थापनामुळे कार्यक्रमाची ठिकाण स्वच्छ आणि सुरक्षित राहिली. तसेच विद्युत विभागाचे ही खास आभार, ज्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी योग्यप्रकारे प्रकाशयोजना आणि वीजपुरवठा केला. आपल्या सहकार्यामुळे कार्यक्रमाचा प्रत्येक क्षण प्रकाशित केला.

मनमाड नगरपालिका विभाग, नांदगाव नगरपालिका विभाग, महसूल, जिल्हा परिषद, आणि सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांचे सुद्धा मनःपूर्वक आभार. आपली मदत व नियोजन यामुळे हा महोत्सव यशस्वीरीत्या पार पडला.तसेच, शिवसेना, महायुतीचे सर्व घटक पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते, आणि इतर सर्वांनी कथेच्या यशात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. आपल्या मुळे हा कार्यक्रम अधिक प्रभावी आणि समृद्ध झाला. शिवभक्तांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने अन्नदान केले, आणि त्यांचेही मनःपूर्वक आभार.

या संपूर्ण शिव महापुराण कथेच्या आयोजनात सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीचे आणि घटकांचे मी मनापासून आभार मानतो. आपली सेवा आणि योगदान आमच्या साठी अमूल्य आहे. शिवरायांच्या आशीर्वादाने आपली अशीच साथ मिळत राहो, हीच प्रार्थना.

धन्यवाद, जय शिवराय! हर हर महादेव!
आमदार सुहास आण्णा कांदे
सौ.अंजुम ताई कांदे


Post a Comment

0 Comments