न्यायडोंगरी उपबाजार समिती मध्ये मकाच्या लिलावास सभापती बोरसे यांच्या हस्ते शुभारंभ

Bay -team aavaj marathi 

नांदगांव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या न्यायडोंगरी उपबाजार समितीच्या आवारात खरीपाचे नविन हंगामातील मका शेतमाल लिलावाचा शुभारंभ सभापती श्री. सतिष बोरसे यांच्या हस्ते गुरूवार दिनांक. 03 सप्टेंबर  रोजी शुभारंभ करण्यात आला. यावेळी कमीत कमी 1460 जास्तीत जास्त 2651 सरासरी 2161 असे बाजारभाव निघाले. 
न्यायडोंगरी यार्डवर मका शेतमालाचा लिलाव सभापती सतिष बोरसे , उपसभापती दिपक मोरे, माजी सभापती विलास आहेर व संचालक मंडळ यांच्या हस्ते करण्यात आला.

 यावेळी मका शेतमाल विक्री करणारे शेतकरी अरविंद राठोड (पिंप्रीहवेली) आणि भिकन पाटील(म्हाळशेवगा) भिमराव चव्हाण(न्यायडोंगरी)यांचा प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमा प्रसंगी सभापती सतिष बोरसे , माजी सभापती विलास आहेर , पत्रकार जगन पाटील , राजेंद्र तिळवणे या सर्वांनी बाजार समिती मार्फत न्यायडोंगरी उपबाजार कायम स्वरूपी सुरु ठेवणेस तसेच व्यापारी वर्गानेही मका बरोबरच कांदा, धान्य कडधान्य शेतमाल खरेदी करणेस पुढे यावे असे आपल्या मनोगतातून आवाहन केले. 

 यावेळी बाजार समितीच्या वतीने शेतकरी बांधवां बरोबरच मान्यवरांचा तसेच व्यापारी वर्गाचाही यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमा प्रसंगी बाजार समितीचे उपसभापती दिपक मोरे, संचालक जिवन गरुड, दर्शन आहेर, अनिल वाघ , अनिल सोनवणे, व्यापारी संचालक अमोल नावंदर, यज्ञेश कलंत्री, हमाल मापारी संचालक निलेश इपर यांचेसह सचिव अमोल खैरनार, शिवाजी बच्छाव, नरेंद्र आहेर, विजय आहेर, संजय आहेर, जालम आहेर, गणेश आहेर, सुनिल आहेर, यांचेसह व्यापारी राहुल छाजेड, सुमतीलाल दुगड, दत्तू शेवाळे , जोएब तांबोळी, शितल अजमेरा हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बाजार समितीचे अधिकारी बाबासाहेब साठे यांनी केले. 

चौकट - नांदगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मार्गदर्शना खाली 

शेतकरी वर्गाला बाजार समिती कार्यालय आवारातच रोख स्वरूपात शेतमाल विक्रीचे पैसे अदा केले जात आहेत. तसेच शेतकरी वर्गाने मका शेतमाल ओला न आणता वाळवून , प्रतवारी करून विक्रीस आणावा जेणे करून बाजारभाव चांगला मिळणेस मदत होईल असे आवाहन बाजार समितीचे सभापती सतिष बोरसे , उपसभापती दिपक मोरे, सचिव अमोल खैरनार यांनी केले आहे.



Post a Comment

0 Comments