Bay- team aavaj marathi 

 Dr. शिवचरण हिंगमिरे पत्रकार उमरखेड (नांदेड)

 गावंडे कनिष्ठ महाविद्यालय उमरखेड येथील फेब्रु -मार्च २६ मध्ये उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अमरावतीच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर असून गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालयाने ९८% निकाल देऊन यवतमाळ जिल्ह्यात अव्वल असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे .

  कला शाखेमधुन कुमारी योगेश्वरी प्रदीप केळापुरे या विद्यार्थिनीने ९१.१७ % मार्क घेऊन कला शाखेत प्रथम स्थान पटकाविले आहे. तर वाणिज्य शाखेचा निकाल शंभर टक्के असून कुमारी प्राजक्ता अनंता काळबांडे या विद्यार्थिनीला ८६.३३% गुण प्राप्त झालेले आहेत.

 तसेच विज्ञान शाखेचा निकाल १००% असुन श्रेयश दत्तात्रय सुने या विद्यार्थ्याने ८८ % गुण घेऊन प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.एच.एस . सी . व्होकेशनल शाखेत कु. जयश्री कुंडलिक मेंडके या विद्यार्थिनीने ७६.६७ % घेऊन प्रथम क्रमांक पटकावला आहे . 

हे महाविद्यालय विदर्भाच्या शेवटच्या टोकाला असून येथे शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी ग्रामीण व दुर्गम भागातील असून तरीही सदर महाविद्यालयाचे व्यवस्थापन प्राचार्य व सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी वृंद, विद्यार्थ्यांची उत्तरोत्तर प्रगती करण्यासाठी प्रयत्नशील असतात. या सर्व गुणवंत ,यशवंत विद्यार्थ्यांचे संस्थेच्या व महाविद्यालयाच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री.राम देवसरकर व संस्थेचे सचिव माननीय डॉ .या.मा .राऊत साहेब तसेच सर्व संचालक मंडळ आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर माधवराव कदम व उपप्राचार्य प्रा. लाभशेटवार ,पर्यवेक्षक प्रा. जाधव व सर्व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक वृंदा नी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. यवतमाळ जिल्ह्यात गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयाचा बारावीचा निकाल सर्वोत्कृष्ट असून ही बाब जिल्ह्यासाठी व विभागासाठी कौतुकास्पद ठरली आहे .