न्यू इंग्लिश स्कूल मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी शिवरायांच्या जयघोषाने परिसर दुमदुमला.....

Bay-team aavaj marathi 

शरद आहेर सर पत्रकार नांदगाव (नाशिक)

नांदगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव मध्ये रयतेचे राजे, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (शिवजयंती) अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी साकारलेली शिवकालीन वेशभूषा आणि ढोल-ताशांच्या गजरात निघालेली महाराजांची मिरवणूक मुख्य आकर्षण ठरली.

 कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने झाली. 'जय भवानी, जय शिवाजी'च्या घोषणांनी संपूर्ण शाळा परिसर दुमदुमून गेला होता. 

  हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, जाणता राजा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे संचालक इंजि अमित भाऊ बोरसे-पाटील, रमेश अण्णा बोरसे, विजय काकळीज, दिलीप गोटे, विठ्ठल आहेर, प्राचार्य हरिश्चंद्र ठाकरे,मुख्याध्यापिका ज्योती काळे पर्यवेक्षक अविनाश शेवाळे , अशोक मार्कंड यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी 'शिव आरती' आणि 'शिव पाळणा' विद्यालयातील गीत मंचाने सादर केले.त्यांना मार्गदर्शन संगीत शिक्षिका कल्पना अहिरे यांनी केले. महाराजांच्या पराक्रमाचे वर्णन करणारा 'पोवाडा' सादर करताना विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

 यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी मावळे, राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा परिधान केली होती. विविध विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणांतून शिवरायांच्या युद्धनीती वर आणि स्वराज्याच्या स्थापनेवर प्रकाश टाकला.मुख्याध्यापिका ज्योती काळे यांनी विद्यार्थ्यांना शिवजयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा दिला.

 संस्थेचे संचालक इंजि अमित भाऊ बोरसे-पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिवरायांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी व्याख्यान दिले. ते म्हणाल्या की," शिवाजी महाराज हे केवळ एक राजे नव्हते, तर ते एक उत्तम प्रशासक आणि रयतेचे कैवारी होते. त्यांचा पराक्रम, शिस्त आणि नैतिक मूल्य आजही आपल्याला मार्गदर्शक ठरतात .विद्यार्थ्यांनी त्यांच्या आयुष्यातून जिद्द आणि स्वाभिमान हे गुण आत्मसात केले पाहिजेत." घोड्यावरून काढलेली भव्य शोभायात्रा, पोवाडा, शिव आरती आणि पाळणा गायन, भाषणे हे या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य होते.

या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक समिती प्रमुख शरद आहेर यांनी केले.

Post a Comment

0 Comments