जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी....

  Bay- team aavaj marathi 

विजय जी चोपडा जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम स्कूल मधील प्री- प्रायमरी विभागातील शालेय बालचमूनी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली. राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित असलेल्या माहितीवर विद्यार्थ्यांनी विविध सादरीकरण केले. यामुळे शाळेमध्ये शिवमय वातावरण निर्माण झाल्याने चैतन्य निर्माण झाल्याचे दिसून आले.

शाळेचे प्राचार्य श्री मणी चावला यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. तसेच इयत्ता नर्सरी, एलकेजी, यूकेजीच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. यावेळी प्राचार्य मणी चावला ,जेष्ठ शिक्षिका रिटा उबाळे, सुषमा काळे, वैशाली सोनवणे, दत्तात्रय पवार,तसेच प्री- प्रायमरी विभागातील सर्व शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.याप्रसंगी शिवरायांच्या, वीर मावळ्यांच्या कथा, पराक्रम याबाबत विद्यार्थ्यांनी कथन केले. विद्यार्थ्यांनी भाषणे, पोवाडे, पाळणे गीत गायन करून शिवजयंती उत्सवात सहभाग घेतला. 

 यावेळी सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन मा. श्री. सुशिलकुमार जी कासलीवाल तसेच संस्थेचे सेक्रेटरी विजय चोपडा, सुशिल भाऊ कासलीवाल, सौ.प्रमिलाताई कासलीवाल, जुगलकिशोर अग्रवाल,रिखबकाका कासलीवाल, महेंद्र भाऊ चांदिवाल, प्रिन्सिपॉल मणी चावला तसेच शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments