येथे प्रत्यक्षात शिक्षक कार्यरत नसताना 'कागदावर शिक्षकाची नेमून करुन' शासनाची ७५ लाखांची केली फसवणूक

 Bay- team aavaj marathi 

मालेगाव येथे तब्बल १५ वर्षे शिक्षक प्रत्यक्षात कार्यरत नसतानाही कागदी घोडे नाचवून ऑनलाइन च्या जमान्यात प्रत्यक्ष नेमणूक दाखवून शासनाची सुमारे ७५ लाखांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार घडल्याचे उघड झाल्यानंतर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की,मालेगाव येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचालित सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेत दि १५ जानेवारी २०१४ पासून ते २१ जानेवारी २०२६ या कालावधीत प्रत्यक्षात शिक्षक शाळेत प्रत्यक्ष कार्यरत नसतानाही त्यांच्या नावाने बेकायदेशीर नेमणूक, वेतन, देयके व फरक बिले सादर करण्यात आली. हे सर्व व्यवहार संगनमताने व वैयक्तिक आर्थिक फायद्यासाठी केल्याचे उघडकीस आल्यानंतर छावणी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक योगेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या गैरव्यवहारात संस्थेचे अध्यक्ष सुनील वडगे, सचिव जिभाऊ आहिरे, तत्कालीन मुख्याध्यापिका, लिपिक नीलेश वडगे, तत्कालीन लिपिक, कार्यालयीन अधीक्षक तसेच संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी शिक्षक प्रत्यक्षात कार्यरत नसतानाही वेतन अदा होण्यासाठी आवश्यक कागदपत्रांना मंजुरी दिल्याचा आरोप आहे. छावणी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून याबाबत आर्थिक कागदपत्रे, वेतन देयके व सेवा नोंदींची आणि इतर व्यवहाराची सखोल तपासणी सुरू केली असून, पुढील कारवाई तपासाअंती करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून या अनागोंदी कारभारामुळे शिक्षण विभाग चर्चेचा विषय झाला आहे.


Post a Comment

0 Comments