Bay- team aavaj marathi
शरद आहेर सर पत्रकार नांदगाव (नाशिक)
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' निमित्त मविप्र समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात अत्यंत उत्साही वातावरणात 'ग्रंथ दिंडी' सोहळा शनिवारी सकाळी संपन्न झाला. या कार्यक्रमाचे मराठी भाषेचा प्रचार, प्रसार आणि वाचन संस्कृतीची जोपासना करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथपूजनाने करण्यात आली.
ज्ञानेश्वरी, गाथा आणि आधुनिक मराठी साहित्यातील श्रेष्ठ ग्रंथांची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी 'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी' या गीताने संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि मराठीमय झाले होते. ग्रंथ दिंडीमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पारंपारिक वेशभूषेत आलेल्या विद्यार्थ्यांनी हातात मराठी भाषेचे महत्त्व सांगणारे फलक धरले होते.
मराठी पाऊल पडते पुढे! ,ग्रंथ हेच गुरु, मराठी भाषा महाराष्ट्राची शान!"अशा घोषणांनी परिसरातील रस्ते दुमदुमून गेले होते. टाळ-मृदंगाच्या गजरात निघालेल्या या दिंडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.दिंडी कार्यक्रमाचा समारोप विद्यालयाच्या प्रांगणात झाला. यावेळी ज्येष्ठ शिक्षक अशोक मार्कंड यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा इतिहास आणि साहित्याचे महत्त्व पटवून दिले. सर्व विद्यार्थ्यांनी दररोज किमान एक पान मराठी साहित्य वाचण्याची आणि मराठी भाषेतूनच संवाद साधण्याची प्रतिज्ञा घेतली.
मुख्याध्यापिका ज्योती काळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "ग्रंथ हेच आपले खरे मार्गदर्शक आहेत. वाचन संस्कृती लोप पावत असताना अशा उपक्रमांमुळे नवीन पिढी पुन्हा पुस्तकांकडे वळेल."या सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भाषेबद्दल अभिमान आणि वाचनाची गोडी द्विगुणित झाल्याचे पाहायला मिळाले. या कार्यक्रमास वारकरी शिक्षण संस्थेचे नंदू महाराज यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब कवडे यांनी केले तर सूत्रसंचालन स्मिता केदारे याने केले, तर आभार अशोक मार्कंड यांनी मानले. वरील कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अशोक मार्कंड, बाळासाहेब कवडे,रवी कवडे, स्मिता केदारे, देविका चोळके तसेच सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.




0 Comments