विद्यार्थ्यांनी घेतली पोलिस स्टेशन कामकाजाची माहिती विद्यार्थ्यांनी हाताळले शस्त्र

 Bay- team aavaj marathi 

Dr. शिवचरण हिंगमिरे पत्रकार उमरखेड (यवतमाळ)

 २ जानेवारी १९६१ रोजी पोलिस दलाची स्थापना झाली त्या निमित्ताने नुकताच पोलिस रायझिंग डे साजरा झाला त्या निमित्याने स्थानिक मॉडर्न पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्याच्या निमित्ताने क्षेत्र भेट अंतर्गत उमरखेड पोलिस‎ ठाण्याच्या कामकाजाची माहिती देण्यात आली.

विद्यार्थ्यांमध्ये पोलिसा विषयी असणारी भीती कमी व्हावी, भविष्यात त्यांनी पोलिसांचे उत्तम मित्र व्हावे, यानिमित्ताने मॉडर्न पब्लिक स्कूल मधील नर्सरी, एल के जी, यू के जी च्या विद्यार्थ्यांची चमू पोलीस ठाण्यात भेट देऊन कामकाजाची पाहणी केली . एखादा गुन्हा घडला तर त्याची तक्रार कशी नोंदविली जाते इथपासून ते पोलीस ठाण्याचे कामकाज कसे चालते इथपर्यंतची माहिती विद्यार्थी नि घेतली.

 शालेय विद्यार्थ्यांची पोलीस ठाण्यात भेट हा त्याचाच एक भाग असल्याचे प्रतिपादन पोलिस निरीक्षक शंकर पांचाळ यांनी केले.यावेळी विद्यार्थ्यांनी पोलिस जवानांकडील शस्त्रांची स्वतः हाताळणी ही केली.पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधत त्यांच्या शंकाचे समाधान केले. यावेळी शाळेचे व्यवस्थापक सुधीर तवर, मुख्याध्यापिका दिपा चेडे यांच्या सह प्री प्रायमरी चे सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते या उपक्रमामुळे विद्यध्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आणि मोठ्या प्रमाणात कुतुहल सुद्धा निर्माण झाले होते.

Post a Comment

0 Comments