उमरखेड येथे संत शिरोमणी मन्मथ माऊली जयंती उत्साहात साजरी...

 Bay- team aavaj marathi 

Dr.शिवचरण हिंगमिरे पत्रकार उमरखेड (यवतमाळ)

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील शिवाजी वार्डातील महात्मा बसवेश्वर संस्थान शिव मंदिरात संत शिरोमणी मन्मथ स्वामी जयंती निमित्त गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या ग्रंथराज परम रहस्य पारायण सोहळ्याची सांगता शुक्रवार दिनांक २३ जानेवारी रोजी उत्साहात संपन्न झाली. 

१६ व्या शतकांतील वीरशैव संत परंपरेतील थोर संत,संत शिरोमणी मन्मथ स्वामी जयंतीनिमित्त वीरशैव लिंगायत महिला मंडळातर्फे हा पारायण सोहळा व जयंती उत्सव सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सप्ताहात दररोज शिवपाठ, परमरहस्य पारायण, भजन आदी अनेक कार्यक्रम घेण्यात आले. शुक्रवारी दुपारी बारा वाजता संत शिरोमणी मन्मथ माऊलीचा जन्मोत्सव अत्यंत भक्ती पूर्ण व उत्साहात संपन्न झाला. यावेळी भजन व पाळणा गायन आदी कार्यक्रम घेण्यात आले. ग्रंथराज परमरहस्य पारायण सोहळा तसेच जयंती उत्सव कार्यक्रमासाठी लिलाबाई दुधेवार, छाया दुधेवार, गिरजा बाई भोकरे, संताबाई बिचेवार, शोभाबाई सुकळे, कौसल्या पुरमे, जयश्री लाखकर.

 छकुली दुधेवार, वर्षा भोकरे, शोभाबाई बट्टेवार, वनमाला दिघेवार, शोभाबाई दुधेवार, राणी नारेवार, सारिका इंगळे, नंदाबाई दुधेवार, रमाबाई ईत्यादि महिलांनी सहभाग घेतला तर जयंती उत्सव कार्यक्रमाला सावण महाराज बेंडके, नगरसेवक गजानन रासकर,बालाजी शिरडकर,रवी पुजारी,शिवहार बिचेवार,वैद्यनाथ पुजारी यांचेसह परिसरातील अनेक महीला व पुरुष शिवभक्तांची कार्यक्रमाला लक्षणीय उपस्थिती लावली होती.

Post a Comment

0 Comments