कुजलेल्या अवस्थेत मृतदेह वडीलांच्या काळजीपोटी मुलीने चुलत्याला फोन केल्याने उघडकीस आला प्रकार

 Bay- team aavaj marathi 

बाबा फोन उचलत नाहीत, काका जरा घरी जाऊन बघा मुलीच्या काळजी मुळे रक्ताच्या थारोळ्यात पडलेला कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला ही हृदयाच्या टोका चुकावणारी घटना रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात असलेल्या कुर्णे (Kurne) येथे घडली आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, वडिलांच्या काळजीपोटी वरच्यावर करून तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन करून सुद्धा वडील फोन उचलत नसल्याने अखेर त्या मुलीने गावातील आपल्या चुलत चुलत्याला विनंती केली की 'बाबा, गेली चार ते पाच दिवस फोन उचलत नाही आहेत. काका घरी जाऊन बघा,' असे मुलीने फोनवरून चुलत काकांना सांगितले असता काकांनी रात्री बॅटरी घेऊन घरामध्ये बघायला गेले असता मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत होती. त्यांनी बॅटरीच्या उजेडात पाहताच रक्ताच्या थारोळ्यात भाऊ पडलेला पाहून भावाला त्यांना धक्काच बसला. हा प्रकार लांजा तालुक्यातील कुर्णे येथे घडला असून, सुरेश तथा भरत रामचंद्र पड्ये (वय ४५), असे मयत नाव आहे.

मुंबई येथे असलेल्या दोन नंबरच्या मुलीचा त्यांना कायम फोन असायचाच; पण गेले पाच दिवस वडील फोन उचलत नसल्याने तिच्या जीवाची घालमेल झाली. काळजीपोटी तिने सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान चुलत काका श्याम पड्ये यांना फोन करून सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर ते रात्री ९:४५ वाजता घरी गेले असता घराजवळ मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत होती. दरवाजा ढकलून पाहिले असता भाऊ घरात पडलेला होता. आजूबाजूला रक्ताचा सडा पाहून भावाला धक्काच बसला. स्वतःला सावरत त्यांनी वाडीतील ग्रामस्थांना फोन करून वरील घटनेची माहिती दिली. 

त्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह तसेच अनेक ठिकाणी रक्ताचे डाग असल्याने पोलिस पाटील सुनील पड्ये यांना घटनेची माहिती दिली असता, त्यांनी घटनेची खात्री करून लांजा पोलिस ठाण्यात माहिती दिली. रात्र असल्याने घटनास्थळी पोलिसांना ठेवण्यात आले. मंगळवारी सकाळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी, पोलिस उपअधीक्षक राधिका फडके, राजापूर चे पोलिस निरीक्षक अमित यादव, उपनिरीक्षक अमोद सरगंले, उपनिरीक्षक देवकन्या मैंदाड, सहा. पो. उपनिरीक्षक सचिन भुजबळराव, सहा. पो. उपनिरीक्षक संजय जाधव हवालदार राजेंद्र कांबळे, जान्हवी मांजरे, नितेश राणे, चालक उमाजी बजागे यांनी घटनास्थळी धाव घेतली. 

सुरेश रामचंद्र पड्ये यांच्या डाव्या हातावर वर्मी घाव असल्याने त्यांची हाताची नस कापलेली होती. त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे; परंतु त्यांनी स्वतःहून हातावर घाव घातला की, कुणी त्यांच्या हातावर घाव घातला. याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. हा घातपात आहे की, आत्महत्या याचा शोध पोलिस घेत आहेत. रत्नागिरी फॉरेन्सिक लॅब मोबाइल व्हॅन, श्वानपथक यांना पाचारण करण्यात आले. लांजा ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह ग्रामस्थांच्या ताब्यात देण्यात आला. वरील घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अमोद सरगंले करीत आहेत.

तीनही मुलींची लग्न, घरात एकटेच

मयत सुरेश पड्ये यांच्या तीनही मुलींची लग्न झाल्याने ते घरात एकटेच राहत होते. मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होते. आजूबाजूला घरेही नाहीत. त्यातच त्याला दारूचे व्यसन असल्याने तो कधी घरी यायचा, कधी कामावर कधी जायचा यायचा कुणालाच थांगपत्ता नसायचा. कामावरून घरी आल्यावर जेवण करून एकटाच घरी झोपायचा.




Post a Comment

0 Comments