सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते- संचालक अमित बोरसे-पाटील

  Bay- team aavaj marathi 

सिताराम पिंगळे सर पत्रकार नांदगाव (नाशिक)

नांदगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाजाचे होरायझन ॲकॅडमीत वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला.' धरोहर हमारी संस्कृती, हमारी सभ्यता ' या कार्यक्रमाचे उद्घाटन मविप्र नांदगाव तालुका संचालक इंजि.अमित बोरसे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा हा कार्यक्रम रंगतदार सादरीकरणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.

कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. मविप्र तालुका संचालक इंजि. अमित बोरसे पाटील मविप्र शिक्षणाधिकारी डॉ.कैलास शिंदे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दर्शन आहेर, होरायझन ॲकॅडमी नांदगाव शाळेचा प्राचार्या पुनम मढे, समाजसेविका रोहिणी मोरे ज्येष्ठ सभासद बाळासाहेब कवडे,रामनाथ गायकवाड, सुनील बोरसे, विजय काकळीज ,रविंद्र कवडे, वाल्मीक थेटे ,गंगाधर थेटे, भावेश पाटील ,कुणाल देशमुख, अरविंद पाटील, रमेश बोरसे,अशोक पाटील, सुसेन आहेर,डॉ.गणेश चव्हाण, पत्रकार बांधव आदी मंचावर उपस्थित होते.

याप्रसंगी संस्थेचे नांदगाव तालुका संचालक इंजि.बोरसे-पाटील म्हणाले की होरायझन अकॅडमी शाळेने 'धरोहर हमारी संस्कृती, हमारी सभ्यता' या सांस्कृतिक कार्यक्रमातून एक प्रेरणादायक कार्यक्रमाचे आयोजन केले त्यात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा हा कार्यक्रम आहे. सांस्कृतिक कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो व त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते असे मत व्यक्त केले. तसेच प्राचार्या पुनम मढे यांनी प्रास्ताविक केले तर मविप्र शिक्षणाधिकारी डॉ.कैलास शिंदे, डॉ.गणेश चव्हाण,दादाभाऊ राठोड यांनी मनोगत व्यक्त केले.

त्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वागतगीत, गणेश वंदना राजस्थानी गीत, कोळी गीत, बॉलीवूड थीम, गोविंदा, जुबी डुबी, ऑपरेशन सिंदूर ,छावा, तारक मेहता, रामायण,लगान गुजराती नृत्य ,पारिवारिक नृत्य, नारीशक्ती, दशावतार, पर्यावरण वाचवा आधारित सादरीकरणाने प्रेक्षकांची मन जिंकली विविध संस्कृतीचे दर्शन घडवणारी नृत्य आणि समाज प्रबोधन करणारी नाट्य प्रयोग विशेष आकर्षण ठरले.

 याप्रसंगी आशिष लोढा राहुल फोफालिया, संजीव धामणे, राजेश पाटील, डॉ.प्रवीण निकम, ॲड. वंदना पाटील, प्रा.सुरेश नारायणे, स्नेहल देशमुख,सिद्धार्थ पवार, विशाल वडगुले सुरेश शेळके, बाबासाहेब बोरसे मारुती जगधने, किरण काळे, बाबासाहेब कदम, अनिल आव्हाड, अनिल धामणे, प्रज्ञानंद जाधव, विजय बडोदे, किरण भालेकर, संजय मोरे, महेश पवार, महेश पवार, निखिल मोरे, धनराज काकळीज आदी सह सर्व सभासद बांधव पत्रकार बंधू,सर्व क्षेत्रातील मान्यवर, पालक, मविप्र संचलित सर्व शाखांचे, स्था.व्य.समिती अध्यक्ष, सदस्य सर्व संकुलाचे  शाखाप्रमुख शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी प्रतिनिधी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शरयू आहेर,सिताराम पिंगळे, अनुराधा खांडेकर सिद्धी देशपांडे यांनी केले शेवटी आभार शरयू आहेर यांनी मांडले. वंदे मातरम् नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

0 Comments