या महाविद्यालयात तालुकास्तरीय 'युवा महोत्सव' उत्साहात

Bay- team aavaj marathi 

 Dr.शिवचरण हिंगमिरे पत्रकार उमरखेड (यवतमाळ)

इनरव्हील क्लबच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयात इनरव्हील क्लबच्या सहकार्याने 'तालुकास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे सचिव रोटेरियन डॉ. यादवराव राऊत होते. उमरखेड इनरव्हील क्लबच्या संस्थापक अध्यक्ष डॉ. विमलताई राऊत, नांदेड येथील प्रा. अंजना बोखारे व प्रा. स्वाती मेका, प्राचार्य डॉ. माधवराव कदम, इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष उषा तास्के उपस्थित होते.

उद्घाटन कार्यक्रमानंतर प्रा.अंजना बोखारे यांनी 'विवाहपूर्व समुपदेशन' आणि प्रा. स्वाती मेका यांनी 'विधी क्षेत्रातील करिअरच्या संधी' या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. माधवराव कदम यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. उमरखेड विभागीय प्रादेशिक दैनिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पत्रकार सविता चंद्रे यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.उमरखेड तालुक्यातील विविध विद्यालये आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या युवा महोत्सवात सहभाग घेतला होता. 

रांगोळी स्पर्धा, पोस्टर प्रदर्शन स्पर्धा, दोन मिनीट स्पर्धा, गीत गायन स्पर्धा आणि नृत्य स्पर्धेचे आयोजन या निमित्ताने करण्यात आले. तालुक्यातील १०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यां स्पर्धकांनी सहभाग घेऊन हा युवा महोत्सव रंगतदार केला.युवा महोत्सवाच्या समारोपप्रसंगी रोटेरियन डॉ. यादवराव राऊत, डॉ. विमलताई राऊत, आशा देवसरकर, उषा तास्के, प्राचार्य डॉ. माधवराव कदम उपस्थित होते. मान्यवरांच्या शुभहस्ते सर्व स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शीतल धोंगडे यांनी केले तर माधुरी देशमुख व डॉ. वसुंधरा शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष उषा तास्के, सचिव डॉ. शीतल धोंगडे, इनरव्हील क्लबच्या सर्व पदाधिकारी आणि गावंडे महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments