मराठी टिकवणे हिच भाषेची खरी सेवा- साहित्यिक, प्रतिभाताई खैरनार

 Bay- team aavaj marathi 

शरद आहेर सर पत्रकार नांदगाव (नाशिक)

नांदगाव येथील मविप्र समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल  विद्यालयात 'मराठी भाषा संवर्धन काळाची गरज' या विषयावर व्याख्यानाचे'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' निमित्त दि. २० जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कवी विष्णू वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या साहित्यिक प्रतिभा- ताई खैरनार ह्या होत्या. त्यांना पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना आजच्या जागतिकीकरणाच्या युगात इंग्रजीचे महत्त्व वाढत असताना आपण आपल्या मातृभाषेकडे दुर्लक्ष करत आहोत, ही चिंतेची बाब आहे.

मराठी टिकवायची असेल, तर तिचा वापर केवळ साहित्यात न राहता दैनंदिन व्यवहारात, तंत्रज्ञानात आणि प्रशासनात अभिमानाने व्हायला हवा.तसेच नविन पिढीने मराठी पुस्तके, वर्तमानपत्रे वाचण्याची सवय लावून घ्यावी, जेणेकरून भाषेतील शब्दसंपदा समृद्ध होईल. मुलांशी घरात मराठींत बोलणे आणि त्यांना मराठी संस्कृतीची ओळख करून देणे ही पालकांची पहिली जबाबदारी आहे. असे म्हणाल्या..

मुख्याध्यापिका ज्योती काळे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा अभिमान बाळगण्याचे आवाहन केले. मराठी भाषा केवळ संवाद साधण्याचे साधन नसून ती आपली संस्कृती आणि अस्मिता आहे, असा सूर कार्यक्रमातून उमटला.

यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ज्योती काळे, उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण, पर्यवेक्षक अविनाश शेवाळे, जेष्ठ शिक्षक अशोक मार्कंड आणि शिक्षक वृंद व्यासपीठावर उपस्थित होते. साहित्यिक प्रतिभाताई खैरनार यांचा परिचय उपशिक्षक बाळासाहेब कवडे यांनी करून दिला.

 कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील अशोक मार्कंड, रवी कवडे, बाळासाहेब कवडे, स्मिता केदारे, देविका चोळके तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका, व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता केदारे यांनी तर आभार रवी कवडे यांनी मानले. 

*फोटो ओळ:- मविप्र समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त कवी विष्णू वामन शिरवाडकर यांचे प्रतिमा पूजन करताना साहित्यिक प्रतिभाताई खैरनार,मुख्याध्यापिका ज्योती काळे, उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण, पर्यवेक्षक अविनाश शेवाळे जेष्ठ शिक्षक अशोक मार्कंड.*

Post a Comment

0 Comments