नांदगाव तालुक्यात बिबट्या ने गाय आणि गोऱ्ह्या ला केले लक्ष परिसरात भितीची वातावरण

 Bay- team aavaj marathi 

संतोष कांदे पत्रकार नांदगाव (नाशिक)

नांदगाव तालुक्यातील जळगाव बुद्रुक येथील भास्कर कांदे यांच्या शेतातील वस्तीवर शनिवारी  बिबट्याने एक गाय आणि एक गोऱ्हाला लक्ष केल्याने पंचक्रोशीत मोठी खळबळ उडाली आहे.

सविस्तर माहिती अशी की, भास्कर कांदे हे आपल्या गट नंबर १५१ मधील शेतावरच वास्तव्य करून असतात. त्यांच्याकडे शेतीपयोगी पाळीव जनावरे आहेत. आज मध्यरात्री घरातील सर्वजण झोपेत असताना बिबट्याने एका गायीला ठार केले. व तिचा पूर्ण फडशा पडल्यानंतर एक गोऱ्हा ही ठार केला. 

कांदे कुटुंबाला या घटनेची सकाळी उठल्यानंतर वाच्यता झाली.
   नांदगाव तालुका वन विभागाचे वन परीक्षेत्र अधिकारी हेमंत कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक श्री. वडगे, टेकणर, गंडे, मोरे आदी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. व पंचनामा केला. व उपस्थित शेतकऱ्यांना खबरदारीच्या सुचना केल्यात.

Post a Comment

0 Comments