नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने उच्च माध्यमिक विद्यालयाचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयवंत चव्हाण यांच्या हस्ते सकाळी आठ वाजता ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माध्यमिक शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोटु निकम हे होते.
वरील मान्यवर व माध्यमिक व उच्च माध्यमिक शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्यांनी भारतमातेच्या व देवी सरस्वतीच्या प्रतिमेचे आणि ध्वजाचे पूजन केले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य पी.के. धुळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले त्यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देवून महत्त्व विशद केले.
आपण सर्वांनी गौरवशाली भारतीय परंपरा जोपासण्याचे काम करणे गरजेचे असून, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महापुरुषांच्या बलीदान व योगदान मोठे आहे. शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि नागरिकांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याचा आदर्श घेणे आवश्यक आहे असे प्रा. धुळे म्हणाले. यावेळी गावातील सामाजिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते राजकीय पक्षांचे कार्यकर्ते पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वरील कार्यक्रम आटोपल्यानंतर गावातील प्रमुख मार्गावरून प्रभातफेरी काढण्यात आली होती. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी वंदे मातरम्, भारतीय स्वातंत्र्य दिनाचा विजय असो, भारतमाता की जय च्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक शहाजी मराठे यांनी केले, तर पी. यु. पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले, ध्वजारोहण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
0 Comments