मराठा विद्या प्रसारक समाजाचे, होरायझन अकॅडमी, नांदगाव येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे नांदगाव तालुका संचालक इंजि.अमितभाऊ बोरसे-पाटील यांनी स्वीकारले. व स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण केले.
यावेळी रामनाथ गायकवाड,लक्ष्मण काकळीज, रविकांत पाटील, इंजि. विशाल कवडे, सुसेन आहेर,सचिन पाटील, अशोक पाटील,श्रीमती.स्नेहल देशमुख, रमेश अण्णा बोरसे, डॉ.गणेश चव्हाण, दादाभाऊ राठोड, आशिष लोढा, राहुल फोफालीया,शुभम कासलीवाल आदी. मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. होरायझन अकॅडमी नांदगावच्या प्राचार्या श्रीमती. पूनम डी.मढे यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले,व आपल्या प्रास्तविकातून स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व विशद केले.
याप्रसंगी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात विद्यार्थ्यांनी संचलन केले. यासाठी क्रीडा शिक्षक पृथ्वीराज वडघुले यांनी मार्गदर्शन केले. तसेच देशभक्तीपर गीतांवरती नृत्य सादर करण्यात आले व देशभक्तीपर गीत विद्यार्थ्यांनी सादर केले. त्यांना मार्गदर्शन श्रीमती.अंजली मोरे व संगीत साद संगीत शिक्षक राहुल देवरे यांनी दिली. त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सभासद, शिक्षक, पालक समिती, शालेय व्यवस्थापन समिती, शालेय परिवहन समिती आदी पदाधिकारी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन श्रीमती.अनुराधा खांडेकर यांनी केले.शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
0 Comments