नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील जय बाबाजी इंग्लिश मे. स्कूल व श्री भिमराज चां. काटकर विद्यालयाच्या प्रांगणात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण साजरा करण्यात आला. ध्वजारोहण येथील व्यापारी गोकुळ शेठ कोठारी यांच्या हस्ते करण्यात आले.
ध्वजपुजण हे उपसरपंच अजुंम रफीक पठाण यांच्या हस्ते करण्यात आले. तर सरपंच वाल्मिक गायकवाड यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आला यावेळी सुत्र संचालन विद्यालयाचे प्राचार्य श्रीमती मनिषा काटकर यांनी केले .
कार्यक्रमाचे नियोजन शिक्षीका संगिता शितोळे व तेजस्विनी कोल्हे यांनी केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आणि संस्थेचे अध्यक्ष भिमराज काटकर यांच्या हस्ते प्राचार्य श्रीमती काटकर व शिक्षक वर्ग यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्या नंतर शाळेच्या परिसरात ५० वृक्षांची लागवड करण्यात आली.
मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मिठाई वितरीत करण्यात आली. यावेळी येथील मान्यवर श्री रफिक पठाण, मनोज रिंढे, ग्रा.प. सदस्य आसावा ताई, संतोष साळवे, मच्छिंद्र काळे यांच्यासह पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे संस्थेचे अध्यक्ष श्री भिमराज काटकर यांनी आभार मानले.
0 Comments