प्रयत्न करणे आपल्या हातात आहे उत्साह चांगल्या रुपाने मिळावा यात आजुन वाढ करावी पञकारांचा उपक्रम उल्लेखणीय आहे .मला कार्यक्रमाला बोलून बोलण्याची संधी दिली. असे मत जिल्हा अप्पर पोलीस प्रमुख अनिकेत भारती यांनी व्यक्त केले.
ते मनमाड येथील नांदगांव मनमाड मराठी पञकार संघाच्या वतीने आयोजीत १५ आॅगस्ट दिनी आयोजीत देशभक्तीपर गित. गायन स्पर्धा बक्षिस वितरण प्रसंगी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर पंञकार व पोलीस उपस्थीत होते.
या वेळी प्रथम भारतीय संविधानाचे पुजन करुन कार्यक्रमाला सुरुवात केली या प्रसंगी सात संघाना पारीतोशीक ट्राॅफी वितरण व रोख बक्षिस देण्यात आली.
यावेळी विविध नामवंतानी या संदर्भात शुभेच्छा देत मत व्यक्त केले मनमाड रेल्वेशाळा येथे या देशभक्तीपर गितांचे आयोजन करण्यात आले होते नांदगांव मनमाड मराठी पञकार संघाचे अध्यक्ष अमोल खरे व सदस्यांनी विशेष परीश्रम घेतले तर उपाली परदेशी यांनी सुञ संचालन केले.पुढील काळात या स्पर्धा व्यापक प्रमाणात घेण्यात येथील असे पञकार संघाच्या वतीने जाहीर करण्यात आले कार्यक्रमासाठी पालक शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments