गुड शेफर्ड स्कूल मध्ये स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा

 Bay -team aavaj marathi 

सिताराम पिंगळे सर पत्रकार नांदगाव (नाशिक)

मनमाड मधील गुड शेफर्ड स्कूल मध्ये 15 ऑगस्ट 2024 रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. आयसीएसई दहावीच्या परीक्षेत प्रथम आलेली विद्यार्थीनी कु. सलोनी आहेर च्या आई-वडिलांना व आजी आजोबा यांना ध्वजारोहणाचा मान सन्मान देण्यात आला. 

यावेळी पालक शिक्षक समितीचे सेक्रेटरी श्री. कल्पेश बेदमुथा व अमोल खरे देखील यावेळी उपस्थित होते. इयत्ता आठवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट संचलन सादरीकरण केले *ब्लिस फुल ब्लू, ग्रोवर ग्रीन, रेडिएन्ट रेड, यूथफुल यलो* अशा चार हाऊस मध्ये विद्यार्थ्यांची विभागणी केली गेली होती, संचलनाचे नेतृत्व कु. शुभ्रा गुजराथी ने केले. राष्ट्रभक्तीपर गितांच्या आवाजाने आसमंत दुमदुमुन गेला होता. शाळेतील विद्यार्थी शुभ्रा पाटील व दिक्षा इंगळे यांनी आपले राष्ट्रभक्तीपर भाषण सादर केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर विविध गाण्यांवर व भरतनाट्यम् गाण्यांच्या माध्यमातून देशभक्तीपर गीतावर सुंदर नृत्य सादर केले. 

नर्सरी व केजीच्या विद्यार्थ्यानी भारताची एकता व सर्वधर्म समभाव नाटीकेतुन सादर केला. नववीच्या विद्यार्थ्यानी मुलगा मुलगी एकसमान या विषयावर नाटिका सादर केली. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांचा यथोचित सन्मान देखील शाळेने केला. P.T.A. चे सदस्य, पालक, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शाळेचे माजी विद्यार्थी या प्रसंगी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. क्लेमेंट नायडू यांच्या अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शाळेच्या विद्यार्थिनी जया पानिकर, इशिता पारखे, दर्शनी गायकवाड व आद्विका बोडके यांनी केले.

Post a Comment

0 Comments