अंकाई - टंकाई किल्यावरील एक बिबट्या पिंजर्यात कैद, तर दुसरा मोकाट

Bay- team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

 नांदगांव येवला सीमेवरील अगस्तीमुनी ऋषीचे वास्तव्याने पावन झालेल्या अंकाई- टंकाई किल्ला परिसरातआनेक दिवसा पासून दोन बिबट्यांचे वास्तव्य असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले होते. या बाबत नागरीकांनी तक्रार केल्यावर पिंजरा लावण्यात आला होता. 

या पिंजर्यात दि १७ रोजी एक बिबट्या कैद झाला असून दुसर्या बिबट्याच्या शोधात वनविभाने पिंजरा या परिसरात लावला आहे. परिसरात बिबट्याची दहशत असल्याने व खरीप पिके जोमाने वाढली असतांनाही शेतात जाने कठीन झाले आहे एक बिबट्या पिंजर्यात आला असला तरी आजुन दुसर्या बिबट्याची भिती कायम आहे.अंकाई टंकाई किल्ल्याच्या पायथ्याला घनदाट झाडीत काही दिवसांपूर्वी बिबट्याचे दर्शन झाले होते.  किल्ल्यावर श्रावण महिन्यात पर्यटकांची मोठी वर्दळ असते  
दरम्यान या किल्ल्याजवळ दि ४ ऑगस्ट रोजी ट्रेकिंग करत असताना मनमाड न पा.चे  माजी नगराध्यक्ष बबलू  पाटील, प्रवीण व्यवहारे,किरण भाबड,गणेश वाहळे, डॉक्टर भागवत दराडे, यांना प्रत्यक्षात बिबट्या निदर्शनात आला होता.

 त्यावेळेस वन्यप्राणी मित्र भागवत झाल्टे यांनी संगीतले की अंकाई, विसापूर, कातरणी, कातरवाडी, वडगांव पंगू, रापली परिसरातील नागरिकांनी परीसरात शेती काम करत असताना सावधानी बाळगावी तसेच श्रावण महिना चालू झाला असून या काळात नागरीक,भाविक देवदर्शनाला व पर्यटनाला अंकाई- टनकाई किल्ल्यावर येतात. तरी पर्यटक तसेच नागरिकांनी परिसरात रात्री अप रात्री काम करत असताना सावधानी बाळगावी अशी माहिती झाल्टे यांनी पत्रकारांना दिली होती. त्यांनी माहिती खरी ठरली असून त्याची दखल घेत पिंजरा लावल्याने एक बिबट्या त्यात आडकला असून दुसरा बिबट्या मोकाट असून त्याचा शोध वनविभाग करत आहे.

Post a Comment

0 Comments