नांदगाव तालुक्यातील सव्विस हजार बहिणींना मिळाला तीन हजार रुपयाचा लाभ - श्रीम.पवार

 Bay -team aavaj marathi 

दि.१७.....नांदगाव तालुक्यातील ५३ हजार महिलां- पैकी ३२ हजार ५०० महिलांचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज संगणकीय प्रणाली वरुन ऑनलाईन करण्यात आले होते. त्यापैकी जवळपास सहा हजार पाचशे महिलांचे बॅंक खात्याला आधार कार्ड जोडलेले नसल्याने त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी दिलेल्या बॅंकेच्या खात्याला आधार कार्ड केवायसी केलेली नसल्याने मिळाला नाही.तरी ज्या महिलांच्या बँक खात्यास केवायसी लवकरात लवकर करून घ्यावी जेने करुन सर्वांना वरील योजनेचा लाभ मिळेल असे आव्हान नांदगाव पंचायत समितीच्या महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती प्राची पवार यांनी केले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना श्रीमती पवार म्हणाल्या की, नांदगाव आणि मनमाड नगरपालिका क्षेत्रातील प्रत्येकी १२-१२ हजार व ग्रामीण भागातील २९ हजार महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज दाखल केले. त्यापैकी दि.७ ऑगस्ट पर्यंत २६ हजार महिलांचे कागदपत्रे ऑनलाईन करण्यात आले. त्यात सहा हजार पाचशे महिलांचे बॅंकेत केवायसी नसल्याने त्यांना अद्याप तीन हजार रुपयांचा लाभ मिळाला नाही. तरी अशा सर्व लाभार्थी महिलांनी बॅंकेत जाऊन आपल्या खात्याला आधार कार्ड केवायसी करून घ्यावी जेने करुन सर्वांना वरील योजनेचा लाभ मिळेल. 

तसेच उर्वरित तालुक्यातील २७ हजार महिलांनी ऑनलाईन अर्ज केलेले असून त्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज आणि कागदपत्रे ऑनलाईन करुन घ्यावी. व आपल्या बँक खात्याला आधार कार्ड जोडलेले नसेल तर बँकेत जाऊन बँक खाते पुस्तक झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स इत्यादी बँकेच्या नियमाप्रमाणे केवायसी करण्या- साठी लागणारे कागदपत्र जमा करून केवायसी लवकरात लवकर करून घ्यावी.जेने करुन त्यांना पुढील महिन्या- पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळेल असे त्यांनी सांगितले.
 

Post a Comment

0 Comments