मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची रक्कम भगिनींच्या कर्ज खात्यात जमा करु देणार नाही - आ.कांदे

 Bay- team aavaj marathi 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे यांनी राज्यातील महिलांना दिलेला शब्द पाळला असून त्यांनी दिलेल्या वचनाप्रमाणे अपवाद वगळता सर्व महिलांना दि. १५ ऑगस्ट पासून म्हणजेच रक्षाबंधनापुर्वी तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे. महिलांनी शेतीसाठी किंवा इतर काही व्यवसायासाठी बँकेंकडून कर्ज घेतलेले असून काही कारणास्तव त्यांचे कर्ज थकीत झालेले असेल कर्ज खाते एनपीए मध्ये गेलेले असेल, तरी देखील महिला भगिनींना शासनाकडून दिलेला लाभाची रक्कम बँकेला त्या कर्ज खात्यात जमा करु देणार नाही. असे आ.सुहास अण्णा कांदे यांनी आवाज मराठी न्यूज नेटवर्क प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

 यावेळी बोलताना आ. श्री. सुहास अण्णा म्हणाले की,
 महायुती सरकारने अत्यंत कमी कालावधीमध्ये दिलेला शब्द पाळाला असून महिला भगिनींच्या बॅंक खात्यामध्ये पंधराशे रुपये प्रमाणे दोन महिन्यांचे एक रकमी तीन हजार रुपये वर्ग करण्यात आले आहे. आणि उर्वरित महिलांना देखील लवकरात लवकर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ शंभर टक्के मिळेल याचा मी शब्द देतो असे आ. श्री. कांदे यांनी सांगितले. तर अनेक महिलांनी शेतीसाठी किंवा इतर काही व्यवसायासाठी बँकेंकडून कर्ज घेतलेले असून काही कारणास्तव त्यांचे कर्ज थकीत झालेले असेल कर्ज खाते एनपीए मध्ये गेलेले असेल, तरी देखील महिला भगिनींना शासनाकडून दिलेला लाभाची रक्कम बँकेला त्या कर्ज खात्यात जमा करण्यात येणार नाही. त्याबाबत दक्षता घेतली जाईल त्यासाठी जर कोणाचे कर्ज खाते थकीत झाले असेल आणि बँकेचे अधिकारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे कर्ज खात्यात जमा करत असतील तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आमदार श्री सुहास अण्णा कांदे यांनी केले आहे.


ग्राहकास गरज असल्यास विनंती अर्जाद्वारे रक्कम मिळु शकते - शाखा अधि. कांबळे

याबाबत बोलठाण येथील बॅंक ऑफ इंडिया चे शाखा अधिकारी राहुल कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार वरील योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांनी बॅंकेकडून शेती किंवा इतर काही व्यवसाय करण्यासाठी कर्ज घेतले असेल. व त्यांचे कर्ज थकीत एनपीए मध्ये गेलेले असेल तर त्यांच्या बचत खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे (रक्कम) आली, तर ती रक्कम त्यांच्या बचत खात्यात जमा राहील. मात्र त्या महिलांना काही अत्यावश्यक कामासाठी शासनाने दिलेला सन्मान निधीची मागणी बॅंक शाखा अधिकारी यांच्या नावाने विनंती अर्जाद्वारे केली तर त्या ग्राहकांना देता येवु शकतो. अशी माहिती राहुल कांबळे शाखा अधिकारी- बॅंक ऑफ इंडिया शाखा -बोलठाण यांनी दिली आहे.

बँक खात्याला केवायसी करण्यासाठी बँकेत झालेली महिलांची गर्दी




 

Post a Comment

0 Comments