कोलकोत्ता घटनेचा नांदगाव येथे निषेध करुन तहसीलदारांना निवेदन

 Bay -team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

कोलकत्ता येथे महिला डाॅक्टरवर झालेल्या अत्याचार व जिवे ठार मारणे या घटनेचे देशात पडसाद उमटत आहे. या संदर्भात नांदगांव येथे डाॅक्टर असोशियने नांदगांव तहसिलादार यांना निवेदन सादर करीत दोषीवर कठोर शासन करण्याची मागणी करुन निषेध करण्यात आला व निवेदन देण्यात आले.

तहसील कार्यालयाचे पर्यवेक्षक श्री पाटील यांना नांदगाव डॉक्टर्स असोशिएशन व इंडियन मेडिकल असोशिएशन नांदगाव शाखेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोलकाता येथील आर.जी कार मेडिकल कॉलेजमध्ये एका प्रशिक्षणार्थी पदव्युत्तर डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे. तरी त्या पीडित डॉक्टर च्या कुटुंबाला न्याय मिळावा. आणि पुढील काळात असे क्रुर प्रकार घडू नये तसेच डॉक्टरांना सम्पूर्ण सुरक्षा प्रदान करावी अश्या आशयाचे निवेदन देण्यात आले यावेळी डॉक्टर्स असोशिएशनचे डॉक्टर्स उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments