घोंगाणे परिवाराच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची तालुक्यात चर्चा

 Bay- team aavaj marathi 

मारूती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)


मृत्यूनंतर अवयव,डोळे,किंवा देहदान केले जाते पण मृत्यूनंतर पण परीवाराकडुन रुग्णांची सेवा करण्याचा निर्धार नांदगांव येथील घोंगाणे परीवाराने विनामूल्य सुरु केला आहे. समाज भुषन कै.उमाकांत घोंगाणे यांच्या प्रथम पुण्य स्मरणा निमित्त प्रतिष्ठाण व घोंगाणे परिवारा तर्फे गरजू व गरीब रुग्नासाठी विनामूल्य सर्जिकल साहित्य सेवेचा शुभारंभ दि १८ रोजी संपन्न झाला. या वेळी माजी नगर अध्यक्ष भास्कर कदम यांनी कै. उमाकांत घोंगाणे यांच्या कार्याचा गौरव करीत त्यांच्या पश्चात घोंगाणे परीवाराने ट्रस्टच्या माध्यमातून रुग्नांची सेवा व त्यांना आवश्यक असणारे सर्जिकल साहित्य याचे लोकार्पन केले.

या स्वरूपची दुर्मिळ सेवा नांदगांव तालुक्यात प्रथमच घोंगाणे बंधु यांनी सुरु केली आहे . रुग्णांना लागनारे सर्जिकल साहित्य विनामुल्या देण्यात येणार आहे, कै उमाकंत घोंगाणे हे नांदगांव येथील प्रतिष्ठित व्यापरी होते. त्यांच्या कार्याचा समाज मनावर चांगला ठसा उमटला आहे त्यांच्या निधना नंतर देखील घोंगाणे परीवाराने रजिस्टर संस्था निर्माण करून समाजभुषण कै. उमाकांत शिवलिंग घोंगाणे प्रतिष्ठाण या सेवाभावी संस्थेच्या मार्फत नांदगांव तालुक्यात नाविण्यपुर्ण उपक्रम राबवून रुग्नांना आरोग्यासाठी आरामदायी सेवा देण्यासाठी हॅड्रोलीक पलंग, व्हिलचेअर, वाॅकर, या दर्जेदार सुविधा देण्याचे संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ घोंगाणे यांनी या प्रसंगी जाहिर केले. या कार्यक्रमाचे आयोजन कै. उमाकांत घोंगाणे यांच्या नांदगांव येथील समाधी स्थळावरुन प्रथम पुण्यस्मरणा निमित्त करण्यात आले.

 यावेळी माजी नगराध्यक्ष भास्कर कदम भाजपाच्या जेष्ठ नेत्या अँड जयश्री दौड,अंदरसुल येथील जेष्ठ पत्रकार प्रकाश साबरे, प्रा. सौ. कांचन घोंगाणे / सालपे बारामती आदीनी आंदराजली अर्पण केली. यावेळी समाजबाधंवा -सह विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते.कै. घोंगणे यांनी सलग १७ वर्षाहून अधिक काळ नांदगांव पालीकेचे शिक्षण मंडळाचे सभापती पद भुषविले त्यांच्या कालावधीत आनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले होते. त्यांच्या कार्याचा प्रचार व प्रसार करणे कामी व त्यांच्या स्मृतीना सदैव उजाळा मिळावा तसेच मरावे परी किर्ती उरावे असे कार्य कै घोंगाणे यांच्या हातून झाले तो वसा घोंगाणे परीवाराने पुढे चालू ठेवण्याच्या हेतूने हा नाविण्यपुर्ण उपक्रम रुग्नासाठि सुरु केला आहे .या उपक्रमाचे नांदगांव शहरातुन स्वागत होत आहे .

Post a Comment

0 Comments