सौ. कमलाबाई माणिकचंद कासलीवाल प्राथमिक विद्यालयात रक्षाबंधन निमित्ताने कार्यशाळा घेऊन रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. भारतीय संस्कृतीत प्रमुख सणांमध्ये रक्षाबंधन हा सण भावा बहिणीचा स्नेह व उत्साहाचे पर्व म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने रक्षाबंधन हा सण बाल गोपाळांनी शालेय मैदानावर उत्साहात साजरा केला.
तसेच याप्रसंगी शाळेतील विद्यार्थीनींनी पर्यावरणात महत्त्वाची भुमिका निभावणाऱ्या वृक्षांना राख्या बांधून वृक्ष संवर्धन करण्याची शपथ घेतली. या निमित्ताने पर्यावरणा- मध्ये वृक्षांचे महत्त्व किती महत्वाचे आहे हे शाळेचे मुख्याध्यापक विशाल सावंत यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. संस्थेचे अध्यक्ष सुनीलकुमार कासलीवाल, उपाध्यक्ष सुशील कासलीवाल, सचिव विजय चोपडा, प्रशासक प्रकाश गुप्ता,सहसचिव प्रमिलाताई कासलीवाल, विश्वस्त रिखबचंद कासलीवाल, जुगलकिशोर अग्रवाल, महेंद्र चांदीवाल यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यासाठी. सिद्धार्थ जगताप, अभिजित थोरात, तुषार जेजुरकर, श्रीमती. धन्वंतरी देवरे, निलोफर पठाण, वैशाली शिंदे,जयश्री पाटील,निशिगंधा शेंडगे,जयश्री कुमावत, अर्चना बोरसे ,पुनम खोंडे.यांनी विशेष परिश्रम घेतले.
0 Comments