नांदगाव तालुक्यातील पुर्व भागात घाटमाथ्यावरील विज वितरण कंपनीच्या कर्मचार्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून नागरिक हैराण झाले आहेत.
सविस्तर वृत्त असे की, जातेगाव येथे विज वितरण कंपनीचे ३३/११ के. व्हि. चे सबस्टेशन असुन येथून जातेगाव, ढेकू खु आणि बु, कुसुमतेल, वसंत नगर एक व दोन, चंदणपूरी आणि लोढरे या गावांसाठी व शेती पंपासाठी विज पुरवठा केला जातो. तर विरुद्ध दिशेला असलेल्या बोलठाण गोंडेगाव, रोहिले व जवळकी हे गावे असून तेथे देखील याच सबस्टेशन मधुन विद्युत पुरवठा केला जातो. यावर्षी उण्हाने कहर केला आहे, सकाळी दहा वाजल्यापासून मोठ्या प्रमाणात उष्णता असते सुर्य आग ओकत आहे. घराच्या आत पंखा चालू केल्याशिवाय पर्याय नाही, मोठ्या प्रमाणात गरम होत आहे. अनेक नागरिकांच्या घरात वयोवृद्ध व्यक्ती आहे तर महिला प्रसुत झालेल्या आहेत, उष्णतेमुळे रुग्ण संख्या वाढत आहे.झाडाचे पाण देखील हलताना दिसत नाही.अशा परिस्थितीत घरात पंखा (फॅन), कुलर इत्यादी उपकरणे चालू ठेवल्याशिवाय पर्याय नाही. परंतु विज वितरण कंपनीच्या कर्मचार्यांच्या अनागोंदी कारभारामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
मात्र विरुद्ध दिशेला असलेल्या बोलठाण आणि परिसरात विज पुरवठ्याबाबत काही तांत्रिक अडचण आल्यास विज वितरण कंपनीचे सबस्टेशन मधिल कर्मचारी व वायरमन बोलठाण या एका गावांसाठी सबस्टेशन मधुन नेहमीच सर्वच विज पुरवठा बंद करून इतर गावांतील नागरिकांना विज पुरवठ्यापासुन वंचित ठेवतात. तसेच जातेगाव ला काही तांत्रिक अडचण निर्माण झाली तर बोलठाण चा विज पुरवठा बंद केला जातो.प्रत्यक्षात तेथे सबस्टेशन मधून दोन्ही गाव आणि परिसरासाठी दोन स्वतंत्र विज वाहिन्या आणि यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे तरी सुद्धा कर्मचारी नागरिकांना वेठीस धरताना दिसत आहे.
या बाबत चौकशी करून कारवाई करणे गरजेचे आहे. विज वितरण कंपनीच्या कर्मचार्यांच्या कामाच्या कार्य पद्धतीमुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून नागरिक हैराण झाले आहेत.याचाच प्रत्यय शनिवार दि २६ रोजी नागरिकांना आला बोलठाण येथे तांत्रिक अडचण असल्याने सकाळी ९ वाजे पासून जातेगाव व परिसरातील विज पुरवठा रात्री उशिरा पर्यंत हमकरेसो कायदा म्हणी प्रमाणे बंद ठेवून विक्रम केला. चौकशी केली असता समजले की बोलठाण गावात तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. मग हे कर्मचारी दिवसभर काय करत होते. असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कनिष्ठ अभियंता व कर्मचाऱ्यांचे फोन बंद
नागरिकांच्या विज पुरवठ्याबाबत काही समस्या व अडचणी असल्यास त्या दुर करण्यासाठी विज वितरण कंपनीने सर्व अधिकारी व कर्मचारी यांना मोबाईल चे सिम कार्ड दिलेले असून त्याचे बिल देखील विज वितरण कंपनी भरते. असे असतांनाही काही तांत्रिक अडचणींमुळे विज पुरवठा खंडित झाला किंवा इतर काही अडचणी आल्यास चौकशीसाठी फोन करण्याची गरज भासल्यास येथील कनिष्ठ अभियंता व कर्मचाऱ्यांचे फोन बंद येत असतात त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो.
0 Comments