Bay- team aavaj marathi
विजय जी चोपडा जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)
शालेय जीवन संपल्यानंतर संसाराच्या आणि नोकरी-व्यवसायाच्या व्यापात एकमेकांपासून दूर गेलेले मित्र-मैत्रीण तब्बल २० वर्षांनंतर एकत्र आले, तेव्हा आनंदाला पारावार उरला नाही. निमित्त होते, किसान माध्यमिक विद्यालय वाखारी, नांदगाव येथील २००५- २००६ च्या बॅचच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'स्नेहसंमेलन २०२६' चे. २० वर्षांनंतर एकमेकांना पाहिल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्वांचे गुरुवर्य गोरक्षनाथ बागुल सर यांचा हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. या सोहळ्यासाठी अनेक माजी विद्यार्थी खास वेळ काढून हजर झाले होते.
कार्यक्रमादरम्यान प्रत्येकाने आपले शालेय जीवनातील अनुभव, कट्ट्यावरील गप्पा आणि मधल्या सुट्टीतली डबा खाण्याची मजा या आठवणींना उजाळा दिला. 'तू तसाच आहेस' आणि 'तू पार बदललीस' अशा गप्पांनी संपूर्ण सभागृह दणाणून गेले होते.
*माजी शिक्षकांचा गौरव*
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे ज्या शिक्षकांनी जीवनाला आकार दिला, त्या उपस्थित आजी-माजी शिक्षकांचा सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह विठ्ठल रुक्माई ची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. व बागुल सर, वाघ सर, पाटील मॅडम परदेशी मॅडम, चव्हाण सर,पाटील सर, काकळीज सर शिक्षकांनी आपल्या जुन्या आठवणी सांगत विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यासाठी मोलाचे आशीर्वाद दिले.
*शाळेला भेट*
स्नेहसंमेलन (गेट टुगेदर) निमित्ताने, माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेतील लहान भावंडांसाठी 'स्पोर्ट्स किट' भेट देण्यात आले. त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक खालकर सर व क्रीडा शिक्षक दवंगे सर यांनी भेटवस्तू स्वीकार केले यामध्ये मोलाचे सहकार्य विनोद पवार, संतोष बोडके आणि भरत खत्री यांनी केले, खेळामुळे मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास होतो. आमच्या या छोट्याशा भेटीतून शाळेतील विद्यार्थ्यांना खेळाची गोडी लागावी आणि उद्याचे खेळाडू घडावेत, हाच यामागचा उद्देश आहे
*स्नेहभोजन आणि मनोरंजन*


0 Comments