नांदगाव बाजार समितीत गुढीपाडव्याच्या मुहूर्ताचे आवचित्य साधून दि. १९ मार्च रोजी गावठी कांदा खरेदीस सुरुवात करण्यात आली. यावेळी लिलावामध्ये जय बालाजी ट्रेडिंग कंपनीचे राम निवास कलंत्री यांनी कमलेश येरम या शेतकरी बांधवांचा १०९९ भावाने कांदा खरेदी करत गावठी कांद्याच्या खरेदी हंगामाची सुरुवात केली. या हंगामात प्रथमच नांदगाव बाजार समितीच्या वतीने शेतकरी आणि कांदा खरेदीदार व्यापारी यांचे शाल पुष्पगुच्छ देत सत्कार स्वागत करण्यात आला.
यानंतर १०७ शेतकऱ्यांनी विविध वाहनात आणलेल्या गावठी कांद्याचा देखील लिलाव झाला या मध्ये कमीत- कमी ५०० रुपये तर जास्तीत जास्त ११७८ रुपये या दराने कांद्याची प्रतवारी बघून लिलाव झाल्याचे बाजार समिती- -च्या वतीने सांगण्यात आले. तर सरासरी ९५० या दराने कांदा विकला गेला.
या मुहूर्ताच्या वेळी व्यापारी राम निवास कलंत्री, संदीप खैरनार, मुकुंद खैरनार, ओमप्रकाश अग्रवाल, राहुल फोपलिया, सोमनाथ घोंगाने,संदीप फोपलिया, महेश गोकुळ खैरनार, गजेंद्र कदम, कैलास गायकवाड समाधान भोसले, गणेश पाटील, संजय सोनवणे, महेश चिखले, यांच्या सह बाजार समितीचे मुख्य सचिव अमोल खैरनार, बाबासाहेब साठे, शरद आहेर यांच्यासह अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान आशिया खंडातील कांद्याचे मुख्य बाजार समिती म्हणून ओळख असलेल्या लासलगाव पिंपळगाव बसवंत यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रमुख बाजार समित्यांमध्ये गावठी कांद्याच्या लिलावाची आज मराठी नववर्षाचे अवचित साधून गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुरुवात झाली असल्याचे समजते.
0 Comments