नांदगाव येथे लवकरच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे होणार भव्य स्मारक- आ. कांदे

 Bay- team aavaj marathi 

भरत पारख पत्रकार नांदगाव (नाशिक)

नांदगाव करांना आ.सुहास अण्णा कांदे यांनी दिलेला शब्द पाळत युगपुरुष, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीचे औचित्य साधून भीम जयंतीच्या पूर्वसंध्येला रात्री १२ वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले.आ.सुहास अण्णा यानी मागील वर्षी आंबेडकरी जनतेला दिलेला शब्द दिला होता.

याप्रसंगी मोठ्या प्रमाणात पुष्पवृष्टी करण्यात केली, त्या नंतर बौद्ध वंदना घेण्यात आल्यानंतर डॉ. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो, म.जोतीबा फुले यांचा विजय असो या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी आ सुहास अण्णा यांचा उस्तव समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.



यावेळी मोठ्या संख्येने अंबेडकर अनुयायी बौद्ध उपासक उपासिका नांदगाव परिसरातील सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

याप्रसंगी बोलताना आ.सुहास अण्णा यांनी सर्व प्रथम भीम जयंती निमित्त उपस्थितांना त्यांनी शुभेच्छा देत, आपण लवकरच या स्मारकाचे काम सुरूवात करणार आहेत. प्रत्येकाला अभिमान वाटेल, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आपण बांधू असा विश्वास त्यांनी उपस्थितांना दिला.

तसेच स्मारकाची परवानगी प्रक्रिया पूर्ण झाली असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण कृती पुतळा ही तयार आहे हा पुतळा १४ एप्रिल निमित्ताने आंबेडकर अनुयायी तसेच जनतेला अभिवादन करण्यासाठी दोन दिवस या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. एखाद्या महिन्यानंतर या स्मारकाचे काम सुरू करण्यात होणार आहे. यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीला विश्वासात घेऊन स्मारक बांधले जाईल, आपल्याला जी डिझाईन योग्य वाटेल ती सुचवा आपण त्याप्रमाणे स्मारक या ठिकाणी बनवणार आहेत. असेही यावेळी उपस्थितांना आ. सुहास आण्णा कांदे शब्द दिला. 

Post a Comment

0 Comments