Bay-team aavaj marathi
भरत पारख पत्रकार नांदगाव (नाशिक)
नांदगाव विधानसभा मतदारसंघातील सुविधा केंद्राच्या माध्यमातून नोंदणीकृत कामगारांना सौ.अंजुमताई कांदे यांच्या हस्ते भांड्याचे वितरण करण्यात आले.
इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाच्या माध्यमातून नोंदणीकृत कामगारांना गृहपयोगी वस्तूचा संच भांडी वाटप करण्यात आले तालुकास्तरावर बांधकाम मजुरांसाठी सुविधा केंद्र सुरू झाल्याने बांधकाम मजुरांची सोय झाली आहे आमदार सुहास कांदे यांच्या मागणीनंतर कामगार विभागाने तालुका निहाय हे केंद्र सुरू केल्याने कामगारांची होणारी गैरसोय आता दूर झाली आहे.
नांदगाव सेतू कार्यालयात पंधरा दिवसात एक हजारापेक्षा अधिक बांधकाम कामगारांनी आपले नूतनीकरण केले असून तसेच नवीन नोंदणी झालेल्या प्रत्येक कामगारांना सेफ्टी किट व नूतनीकरण झालेल्या कामगार कुटुंबांना गृहपयोगी साहित्याचे वाटप यावेळी करण्यात आले.
या आगोदर नाशिक तसेच मालेगाव येथील बांधकाम नोंदणी सुविधा केंद्रात मोठी गर्दी होत होती जिल्ह्यातील एकाच ठिकाणी भांडे वाटपासाठी दिवस दिवस थांबावे लागत असल्याने मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता मात्र आता तालुका निहाय गृहोपयोगी भांडी वाटप केंद्र सुरू झाल्याने मजुरांची होणारी गैरसोय थांबण्यास मदत होणार असल्याने याप्रसंगी उपस्थित बांधकाम क्षेत्रातील कारागिर,मजुर बांधवांनी समाधान व्यक्त केले.
वितरण समारंभाचे वेळी समाजसेविका सौ.अंजुमताई कांदे, संगीता बागुल, खुशाली सोनावणे, नेहा खटके, युवासेना तालुकाध्यक्ष सागर हिरे प्रकाश शिंदे सुनील जाधव प्रशांत पगार सेतू केंद्र चालक रवींद्र खैरनार, सोनू रौंदळ,देव गोसावी,दिनेश बच्छाव, हेमंत शेवाळे यांचेसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments