Bay- team aavaj marathi
Dr. शिवचरण हिंगमिरे पत्रकार उमरखेड (यवतमाळ)
भाजपा पक्ष स्थापनेच्या प्रारंभी अगदी पडतीच्या काळा पासुन सुद्धा तन, मन,धनाने पक्षासाठी झटून सेवा केली, वेळप्रसंगी अवहेलना सुद्धा सहन करून काम करणाऱ्या जेष्ठ कार्यकर्त्यांमुळे भाजपा देशातील सर्वात मोठा ठरला त्यामुळेच केंद्रासह अनेक राज्यात सरकार स्थापन करण्यात यशस्वी झाला. असे प्रतिपादन यवतमाळ जिल्हा भाजपचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी केले.
ते उमरखेड येथे नुकतेच राजस्थानी भवन आयोजित जेष्ठ कार्यकर्ता सन्मान सोहळा व शहर ग्रामिण मंडळ अध्यक्षांची निवड या बैठकीत करण्यात आली होती त्यावेळी बोलत होते. श्री.भुतडा पुढे म्हणाले की,भारतीय जनता पार्टीची स्थापना १९८० मध्ये झाली परंतू त्या पुर्वी उमरखेड तालुक्यात त्यावेळी भारतीय जनसंघ या नावाने पक्ष होता. त्या काळात सन १९७०-७१ साली केवळ पाच सदस्यांचा पक्ष होता. मला जे आठवतं त्यापैकी स्व. देविदास राव गांजेगांवकर व त्यांचे समवेत असणारे ढाणकी येथील स्व. काशीराव चंद्रे, धानोरा (सा) येथील गोवा मुक्ती संग्रामातील स्व. रंगरावजी देशमुख, उमरखेड शहरातील अनंतराव पोटे सर व मधुकरराव गांधे हे केवळ पाचच कार्यकर्ते भारतीय जनसंघा पासून कार्यरत होते.
त्यावेळी लोकसभेसाठी दिवा या निवडणूक निशानीवर धानोरा येथील जनसंघाचे कट्टर कार्यकर्ते स्व रंगरावजी देशमुख यांनी निवडणूक लढविली होती. त्यांना त्यावेळी फक्त ६७२ मते मिळाली होती. तो काळ अत्यंत खडतर असा होता आणि त्यानंतर तब्बल १० वर्षानी १९८० साली भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली त्या भारतीय जनता पार्टी चा ४५ वा वर्धापन दिन ४ एप्रिल ला संपुर्ण देशात उत्साहात साजरा झाला.
पक्ष स्थापनेपासून काम करणाऱ्या शहर व ग्रामिण मंडळातील जवळपास १०० कार्यकर्त्यांचा या वेळी सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. त्यामध्ये ॲड. राजेश्वर रायवार, संजय भंडारे, संजीव मुडे, महेश काळेश्वरकर,अजय बेदरकर, डॉ जय शंकर जवने, प्रा. गूजरे, भगवान भंडारी, भगवान महाजन, अशोक गांजेगांवकर यांचेसह भाजपा संघटनेचे तन मन धनाने कार्य करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी विद्यमान आ. किसन वानखेडे, माजी आ. उत्तम इंगळे, माजी आ.नामदेव ससाने, माजी आ. विजय खडसे, ढाणकीचे नगराध्यक्ष सुरेश जयस्वाल, आनंद चंद्रे, अजय बेदरकर, विश्वपाल धुळधूळे, माजी जि.प.अध्यक्ष रमेश चव्हाण, सुदर्शन रावते, दत्तदिगंबर वानखेडे, सविता पाचकोरे, महेश काळेश्वरकर आदी उपस्थित होते.
यावेळी पुसद जिल्हा उपाध्यक्ष निखिल चिद्दरवार निरीक्षक निवड समिती यांनी ग्रामिण व शहर अध्यक्ष निवडी बाबत कार्यकर्त्यांचे मनोगत ऐकून घेतले. भा.ज.पा.चे त्या काळातील जनसंघाचे उमरखेड शहरातील प्रमुख स्वर्गीय देविदास राव गांजेगांवकर यांचा मरणोत्तर त्यांचे जेष्ठ चिरंजीव उमरखेड येथील जेष्ठ पत्रकार राजेश गांजेगांवकर यांनी स्विकारला.या कार्यक्रमाचे संचालन शहराध्यक्ष प्रकाश दुधेवार, यांनी तर प्रास्ताविक जिल्हा सरचिटणीस महेश काळेश्वरकर यांनी केले.
0 Comments