सेवानिवृत्त मुख्याध्यापकाने भावनिक चिठ्ठी लिहून संपवली जिवन यात्रा !!

 Bay-team aavaj marathi 

आजारी असलेल्या पत्नीच्या वेदना पाहू शकत नसल्याने मी तिला मुक्त करतो, आणि स्वतःही मुक्त होत आहे.आमच्या मृत्यूस कोणालाही जबाबदार धरू नये. पत्नी लता हिला नवीन साडी, मंगळसूत्र, जोडवे घालून तिच्यावर अंत्यसंस्कार करावेत.पत्नी लता च्या अंत्यसंस्काराचा खर्च कोणीही करू नये, त्याची तजवीज मी करून ठेवली आहे, अशी चिठ्ठी लिहून ठेवत सेवानिवृत्त मुख्याध्यापक पती मुरलीधर रामचंद्र जोशी (वय ७८)यांनी आगोदर पत्नी लता मुरलीधर जोशी (वय ७६) यांचा गळा आवळून संपवले व त्यानंतर स्वतः ही गळफास घेऊन स्वतः ही आपले जीवन संपविले.

वरील दोघेही नाशिक येथील एकदंत सोसायटी, जेल रोड या ठिकाणी राहतं होते.लता जोशी ह्या दीर्घ आजाराने पीडित असल्याने अंथरुणाला खिळून होत्या. उपचार करूनही प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने व पत्नीच्या वेदना असह्य होत असल्याने मुरलीधर जोशी त्रस्त होते.

जोशी यांची मुले संदीप आणि प्रसन्न हे दोघेही मुंबई येथे वास्तव्यास असून, घटनेची माहिती मिळताच ते मध्यरात्री नाशिकला दाखल झाले. त्यानंतर सर्व प्रक्रिया पार पाडत गुरुवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर लता जोशी यांच्या पार्थिवावर दसक येथील अमरधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. व मयत मुरलीधर जोशी यांच्या इच्छेनुसार त्यांचा देह दान करण्यात आला.  

घटनेचा असा झाला उलगडा 

बुधवारी रात्री त्यांच्याकडे घरकाम करणाऱ्या सीमा राठोड जोशी यांच्या घरी आल्यानंतर जोशी दाम्पत्य मृतावस्थेत दिसल्याने त्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेत उपनगर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला व मुरलीधर जोशी यांनी लिहिलेली चिठ्ठी ताब्यात घेत मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवले. 

सुसाईड नोट मधील भावनिक मजकूर 

मी मुरलीधर रामा जोशी. पत्नीच्या आजाराला कंटाळून आत्महत्या करत आहे. याच्याशी कोणाचा काहीही संबंध नाही. मी खुशीने आत्महत्या करत आहे. तसेच मी लताचा गळा दाबून शेवट करत आहे. लोखंडी कपाटाच्या लॉकर मध्ये ठेवलेले पाच हजार लता च्या अंत्यविधीसाठी चे पैसे आहेत. तसेच लॉकर मधील मंगळसूत्र अन् जोडवी लताला घाला दरम्यान, सेवानिवृत्त मुख्याध्यापक मुरलीधर जोशी यांची सुसाईड नोट समोर आली आहे.

पोरांनी मला माफ करावे. सीमाने (गृहसेविका) खूप सेवा केली. तिला माझ्याकडून ५० हजार रुपये चालू खात्यातून द्यावे. ती बाहेर गेली असताना मी हे कृत्य करत आहे. तिचा संबंध नाही. तिच्या मुलाची फी भरण्यासाठी पैशांचा उपयोग होईल. मंगळसूत्र, जोडवी आहेत. ते लताला घालावेत. नंतर सीमा राठोड हिला द्यावेत. माझे देहदान करावे. लताचा तुमची इच्छा असल्यास अंत्यविधी करावा. माझी आत्महत्या फेल झाली तर मात्र वृद्धाश्रमात ठेवावे. माझ्या कृत्यास कोणीही जबाबदार नाही, असे त्यांनी चिठ्ठीत नमूद केले होते.



Post a Comment

0 Comments