आयशर गाडीच्या धडकेत नांदगाव च्या तरुणाचा मृत्यू

 Bay- team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

नांदगाव - चाळीसगाव रोड वर पिंपरखेड शिवारात टोल नाक्याजवळ शुक्रवार दि.११ रोजी रात्री दहा वाजता गणेश बळीराम देवरे राहणार नांदगाव यांचा आयशर ट्रकने धडक दिल्याने मृत्यू झाला.

या बाबत सविस्तर माहिती अशी की, पिंपरखेड शिवारात टोल नाक्याजवळ शुक्रवार दि.११ रोजी रात्री दहा वाजता गणेश बळीराम देवरे राहणार नांदगाव हा लघुशंकेसाठी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेला असता आयशर ट्रक च्या नंबर एम एच 19 सी एक्स 1426 या गाडीने जोरदार धडक दिल्याने मृत्यू झाला.

गणेश देवरे हा घरातील कर्ता पुरुष होता, तो थंड पाणी विक्रीचा व्यवसाय करुन आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवत होता. त्याच्या अपघाताची माहिती समजताच तो राहत असलेल्या होलार वाडा परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. त्यांचे वर शोकाकुल वातावरणात नांदगाव येथील अमरधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

अपघाताची नांदगाव पोलिस ठाण्यात चेतन योगेश ठाकूर रा.चाळीसगाव यांनी दिलेल्या माहितीनुसार अपघात घटनेची नोंद झाली घटनेचा तपास पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गोसावी करत आहे.
   


 


 



 

Post a Comment

0 Comments