मुलीच्या मृत्युस कारणीभूत ठरलेल्या वाहन चालकास न्यायालयाने ठोठावली दोन वर्षाची सजा व दहा हजार रुपये दंड

 Bay-team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

भरधाव वेगाने वाहन चालवून एका दोन वर्षांच्या मुलीच्या मृत्युस कारणीभूत ठरलेल्या वाहन चालकास नांदगाव न्यायालयाने दोन वर्ष सश्रम कारावासाची सजा व दहा हजार रूपये दंड ठोठावला आहे. या निकालामुळे भरधाव वेगाने वाहन चालवणाऱ्या चालकांना धडा मिळाला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,आरोपी केशव कचरू धात्रक याने दि १२ एप्रिल २०१३ रोजी त्याचे ताब्यातील मारुती ओम्नी वाहन भरधाव वेगात चालवीत असताना त्याचा वाहनावरील ताबा सुटून वाहन पोखरी पुलाजवळ नाल्यात पलटी झाले व त्यात असलेल्या प्रवाश्यांना यांना दुखापती झाल्या होत्या. पैकी वरील वाहनात प्रवास करत असलेली २ वर्षांची मुलगी प्रतीक्षा पृथ्वीराज चव्हाण ही मयत झाली होती. या केसमध्ये आरोपी विरुद्ध सरकार पक्षातर्फे एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले.

सरकार पक्षतर्फे पूर्व सरकारी अभियोक्ता श्री मेटकर, श्री एस.पी.आहेर, श्री पी एस.मोरे यांनी प्रत्येकी १-१ साक्षीदार तपासले व उर्वरित साक्षीदारांची सरकारी अभियोक्ता श्री चेतन  जायलवाल यांनी साक्ष घेतली होती मिळून आलेल्या पुराव्याच्या आधारे सरकार पक्षाची प्रखरपणे बाजू मांडून आरोपीने केलेला गुन्हा सिद्ध झाल्याचे व मयत प्रतीक्षा हीचे मृत्युस आरोपीच जबाबदार असल्याचे त्यांच्या युक्तिवादातुन पटवून दिले.वरील घटनेची मे. नांदगांव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री जगदीश अग्निहोत्री साहेब यांनी शहानिशा करून आरोपीस भा.दं.वि. चे कलम 304 (A), 279, 337, 338, व मो.वा. कायदा कलम 184 अन्वये दोषी धरुन त्यास भा. द. वि. कलम 304(A) अन्वये 2 वर्ष सश्रम कारावास व दहा हजार रुपये  दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

यानिमित्ताने न्याय मंदिरात आजही न्याय मिळतो असे यावेळी उपस्थितांच्या चर्चेतून सुर निघाला.याकामी पोलिस निरीक्षक श्री प्रीतम चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी श्री सचिन मुंढे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments