महात्मा फुले यांना आ. कांदे दांपत्याने केले अभिवादन

 Bay-team aavaj marathi

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

क्रांतीज्योती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती निमित्त कार्यसम्राट आमदार सुहास (आण्णा) कांदे व सौ.अंजुमताई  कांदे यांनी नांदगाव शहरातील फुले चौक येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्या पुष्प हार अर्पण करत अभिवादन केले.

या वेळी बोलतांना अण्णांनी उपस्थितांना जयंती निमित्त शुभेच्छा देताना लवकर या ठिकाणी फुले दांपत्याचा पूर्णाकृती पुतळा असेल आणि आपण उत्साहात त्याचे अनावरण करू असे सांगितले. 

तसेच सोबतच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचाही पूर्णाकृती पुतळा नांदगाव शहरात बसविण्यात येणार असल्याचे सांगितले. या वेळी शिवसेना नेते विश्नु निकम सर, नांदगाव नगरपरिषदेचे माजी लोकनियुक्त अध्यक्ष राजेश (बाबी काका) कवडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दर्शन आहेर, अमोल नावंदर, दिपक खैरनार, भाजपा नेते दत्तराज छाजेड, सुमित गायकवाड महेंद्र गायकवाड, उत्सव समिती अध्यक्ष बापूसाहेब खैरनार, भावराव बागुल, मंगेश खैरनार, राजु अण्णा मोरे, यांच्यासह शिवसैनिक, शिवसेना नेते, युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी, उत्सव समिती कार्यकर्ते आणि फुले प्रेमी, तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments